आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात काँग्रेसला अच्छे दिन! राष्ट्रवादीनंतर आता या पक्षाचा पाठिंबा, सर्व्हेतही आघाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेसच्या बाजूने सर्व काही चांगले घडताना दिसत आहे. - Divya Marathi
कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेसच्या बाजूने सर्व काही चांगले घडताना दिसत आहे.

बंगळुरू- कर्नाटक विधानसभेची निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. तेथे काँग्रेस, भाजप आणि जेडी (एस) यांच्यात तिरंगी लढत आहे. मात्र, सत्ताधारी काँग्रेसच्या बाजूने सर्व काही चांगले घडताना दिसत आहे. इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेत कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर राहील असे म्हटले आहे. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसला कर्नाटकात बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता, तर आता खासदार ओवीसींच्या एमआयएमने कर्नाटकमध्ये एकही उमेदवार उभा न करता काँग्रेसला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपला बॅकफूटवर ठेऊन कर्नाटकमध्ये काँग्रेसला अच्छे दिन येणार असे दिसून येत आहे. 

 

कर्नाटकमध्ये मुस्लिम लोकसंख्या ब-यापैकी आहे. त्यामुळे एमआयएमने उमेदवार उभे केल्यास काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, एमआयएम पक्षाच्या पदाधिका-यांसोबत खासदार ओवीसींनी चर्चा केल्यानंतर साप्रदायिक व जातीयवादी शक्ती रोखण्यासाठी कर्नाटक विधानसभेत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेत काँग्रेसचा मार्ग मोकळा केला आहे. याआधी राष्ट्रवादीने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

 

काँग्रेस सर्व्हेतही सर्वात मोठा पक्ष-

 

इंडिया टुडेने घेतलेल्या सर्व्हेनुसार, 224 जागा असणा-या कर्नाटक विधानसभेच्या सभागृहात काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत पक्षाला 92 ते 101 जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे. तर, भारतीय जनता पक्षाला 78 ते 86 जागा मिळू शकतात. माजी पंतप्रधान एचडी दैवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) पक्षाला 34 ते 43 जागा मिळतील असे इंडिया टुडेच्या सर्व्हेत म्हटले आहे. 

 

2013 साली काँग्रेसने 224 पैकी 122 जागा जिंकल्या होत्या. तर भाजप व जेडी (एस)ला प्रत्येकी 40 जागा मिळाल्या होत्या. येडीयुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पार्टीला 7 जागा मिळाल्या होत्या.

 

सिद्धरामय्यांना बहुमत मिळण्याचा विश्वास-

 

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इंडिया टुडेच्या सर्व्हेनंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कर्नाटकात यंदा पुन्हा एकदा काँग्रेस बहुमताने सत्तेत येणार आहे. ओपिनियन पोल काय म्हणताहेत हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचे नाही. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...