आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाई- बापाने जे साेसलं तेच अाम्हालाही साेसावं लागतंय;माेर्चातील पिचलेल्या अादिवासी शेतकऱ्यांची अार्त भावना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अामाला पैका मिळत नाय, धान्याला भाव नाय, वन जमीन कसताेय, पण सातबारा नावावर नाय, अामच्या अार्इ- बापाने साेसलं अाता अाम्हाला हाल साेसावं लागतंय, अाता तरी अाम्हाला न्याय मिळणार का? नाशिकच्या पेठ तालुक्यातून अालेल्या तुलसा दरवडे यांनी व्यक्त केलेल्या तीव्र भावना. एकट्या तुलसा दरवडेच नाही तर नाशिकच्या पेठ, सुरगणा, दिंडाेरी, देवळा, चांदवड, कळवण, सटाणा, निफाड, जव्हार, पालघर, माेखाडा , अकाेला , नांदेड, जालना या भागातून अालेल्या बहुतांश अादिवासी शेतकऱ्यांनी २००८ मध्ये वन हक्क कायदा हाेऊनही त्याची अंमलबजावणी हाेत नसल्याबद्दल ‘दिव्य मराठी’कडे तीव्र भावना व्यक्त केल्या.  


साेमवारी सकाळी अाझाद मैदानावर अालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकलेले भाव हाेते. मात्र, अापल्या न्याय मागण्यांसाठी अाता निर्णय घेऊनच जायचे अन्यथा या मैदानावरच राहायचे, अशी ठाम भूमिका  घेत या शेतकऱ्यांनी मैदानाचा ताबा घेतला. अात्महत्याग्रस्त कुटुंबांना पुरेशी मदत द्या, जमीन अामच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, देवस्थान जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करा, सरकारला अजून किती जणांचे बळी हवे अाहेत, असे फलक घेतलेला बळीराजा अापल्या मागण्यांसाठी घाेषणा देत हाेता. पेठ तालुक्यातल्या माेहदाण गावातील लहानू गुरव शेतकऱ्याने  वन हक्क कायदा लागू हाेऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. वन हक्कासाठी दावे दाखल करूनही ते अपात्र ठरवले. जमीन नावावर नसल्याने कर्ज मिळणे मुश्कील झाल्याचे सांगितले. अकाेल्यातील जांभळदारा येथे राहणारे ७५ वर्षांचे वयाेवृद्ध शेतकरी साहेबराव गायकवाड म्हणाले, वन जमिनीचा सातबारा करण्यासाठी १९८४ पासून प्रयत्न करताेय पण काहीच हाताला अाले नाही. रेशनवर पुरेसे धान्य मिळत नसल्याने पाेटभरणे कठीण झाले अाहे. दिंडाेरीच्या इराबाई गायकवाड म्हणाल्या, माेर्चात अाश्वासन मिळण्याची सवय झाली अाहे. गारपिटीमुळे टाेमॅटाेचे पार नुकसान झाले, रेशनवर शिधा मिळत नाही, शेतीतून घर चालेल इतकीच कमाई हाेते. अाताही शिष्टमंडळ भेटून येईल पुन्हा अाश्वासन मिळेल. पण नंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी हाेणार का? असा सवाल केला. 

 

सातशे शेतकऱ्यांवर झाले उपचार  
अापल्या मागण्यांच्या उत्तराची रणरणत्या उन्हात प्रतीक्षा करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना उलट्या, डाेकेदुखी, मळमळीचा त्रास झाला. ७०० शेतकऱ्यांवर डाॅक्टरांच्या पथकाने उपचार केले. काही शेतकऱ्यांवर जे.जे. अाणि सेंट जाॅर्ज रुग्णालयात उपचार केले.

 

एक लाख भाकऱ्या  
भुकेने व्याकूळ झालेल्या बळीराजासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने खास रायगड येथून सव्वा लाख भाकऱ्या अाणि ५०० किलाे सुकटचे जेवण वितरित करण्यात अाले. नाशिकमधील अनेक शेतकरी अनवाणी मुंबईला येत असल्याचे बघून अनेक स्वयंसेवी संघटनांनी अाझाद मैदानात चपलांचे वाटप केले.

बातम्या आणखी आहेत...