आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेला घेराव घालणाऱ्या किसान सभेचा नव्या आंदोलनाचा एल्गार, देशभर जेलभरो आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन यशस्वी करुन दाखवल्यानंतर किसान सभेने आता आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला आहे. 9 ऑगस्टला एकाच दिवशी देशभरातले कोट्यवधी शेतकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत. अखिल भारतीय किसान महासभेच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

 


विधानसभेला घेराव घालणाऱ्या किसान महासभेच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सध्या राज्यात सुरु आहे. आता हे आंदोलन दिल्लीपर्यंत पोहचवण्याचा अखिल भारतीय किसान महासभेचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीत अखिल भारतीय किसान महासभेच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. डॉ. अशोक ढवळे, अजित नवले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचीही या बैठकीला उपस्थित होती.

 


मुंबई हे आंदोलनाचा एक टप्पा होते, त्यानंतर अजूनही बरीच ध्येये गाठायची आहेत, असे म्हणत त्यांनी आपल्या नव्या आंदोलनाची घोषणा केली. उद्यापासून देशभरातल्या शेतकऱ्यांच्या घराघरात जाऊन 10 कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन पंतप्रधानांना पाठवले जाणार आहे. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची संपूर्ण अंमलबजावणी या तीन मुद्द्यांवर हे आंदोलन असेल. या सह्यांचे निवेदन पाठवल्यानंतर 9 ऑगस्टला एकाच दिवशी देशभरातले कोट्यवधी शेतकरी जेलभरो आंदोलन करतील, अशी घोषणा डॉ. ढवळे, नवले व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...