आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एल्गार परिषदेमुळे कोरेगाव भीमाची दंगल, प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला- संभाजी भिडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- राजकीय स्वार्थ व मतांच्या लाचारीसाठी कोरेगाव भीमा दंगल घडविली व त्यानंतर भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या भडक वक्तव्यामुळे हिंसा भडकली असे मत कोरेगाव-भीमा हिंसेतील एक संशयित असलेल्या संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.

 

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसा घडली. या प्रकरणी 72 दिवसानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा सूत्रधार मिलिंद एकबोटेंना अटक केली आहे. यानंतर भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेचे आणखी एक संशयित सूत्रधार संभाजी भिडे यांना 26 मार्चपर्यंत अटक करा अन्यथा राज्यातील शेकडो पुरोगामी संघटना विधानसभेवर मोर्चा काढतील असा इशारा आंबेडकर यांनी दिला होता. सोबतच हा मोर्चा कोणत्याही एका पक्षाचा, संघटनेचा असणार नाही तर 250 पुरोगामी व विविध चळवळीशी जोडल्या गेलेल्ल्या संस्था- संघटनाच्या वतीने काढला जाईल अशी घोषणा आंबेडकर यांनी केली होती. त्यामुळे विविध कारणांनी सध्या अडचणीत सापडलेल्या सरकारला संभाजी भिडेंबाबत काहीतरी भूमिका घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांनी आज सांगलीत एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

 

संभाजी भिडे म्हणाले, कोरेगाव भीमा हिंसेमागे माझा काहीही संबंध नाही. त्यादिवशी मी सातारा-सांगलीत होतो. राजकीय स्वार्थ व मतांच्या लाचारीसाठी हे षडयंत्र रचले गेले होते. कोरेगाव भीमा दंगलीचे खरे सुत्रधार वेगळेच आहेत. ही हिंसा घडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र पेटला. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचीही चौकशी करा आणि कोरेगाव भीमा हिंसेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भिडे यांनी केली.

 

कोरेगाव भीमा हिंसाचाराला एल्गार परिषदच जबाबदार असल्याचा आरोप करत संभाजी भिडे म्हणाले, सर्वच पक्ष मतांच्या लाचारीसाठी व दलितांची मते मिळविण्यासाठी या घटनेला हवा दिली गेली. प्रकाश आंबेडकर हे बुद्धीमान व चांगल्या घराण्यात जन्माला आले आहेत. त्यांनी कोणतेही शहानिशा न करता त्यांनी माझ्यावर आरोप केले ते चुकीचे आहे. त्यांना कुणीतरी माहिती दिली म्हणून माझे नाव त्यात घेणे योग्य नाही. यानंतर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र पेटला. या हिसेंत नुकसान करणा-यांकडून नुकसानभरपाई घेतली पाहिजे, असेही भिडे यांनी सांगितले.

 

एल्गार परिषद घेणा-यांना पहिले अटक करा, मग आमच्याकडे बोट दाखवा असे सांगत भिडे म्हणाले, या प्रकरणात मिलिंद एकबोटेंना अटक करणे योग्य नाही. ज्या लोकांनी शनिवारवाड्यांवर जे विष, अमृत ओखले त्यांची आधी चौकशी करा, त्यांना अटक आधी करा मग सर्वांची चौकशी करा. प्रकाश आंबेडकरांनी आमची नावे कशी घेतली, कोणाच्या सांगण्यावरून घेतली याची चौकशी झाली पाहिजे. जर हे घडले नाही तर 28 मार्चला महाराष्ट्रभर मोर्चा काढण्याचा इशारा भिडे यांनी दिला. 

बातम्या आणखी आहेत...