आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमार केतकर यांनी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भरला राज्यसभेचा अर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुमार केतकर यांनी काँग्रेसमधील दिग्गजांच्या उपस्थितीत राज्यसभेचा अर्ज दाखल केला. - Divya Marathi
कुमार केतकर यांनी काँग्रेसमधील दिग्गजांच्या उपस्थितीत राज्यसभेचा अर्ज दाखल केला.

मुंबई- ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकर यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेचा अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार गणपतराव देशमुख, अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे, अबू आझमी आदी नेते उपस्थित होते.

 

काँग्रेसने बड्या नेत्यांना डावलून कुमार केतकर यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारास संधी दिली आहे. कुमार केतकर हे डाव्या विचारांचे मानले जातात. मात्र, ते कायमच नेहरू, इंदिरा गांधींसह काँग्रेसने देशाला मागील 70 वर्षात दिलेल्या योगदानाचे समर्थक राहिले आहेत. काँग्रेसच्या चुकांवरही त्यांनी अनेकदा परखड मते मांडली आहेत. मात्र, काँग्रेस पक्षच सर्वसमावेश असून, तोच देशाला पुढे घेऊन जाणारा आहे अशी त्यांची ठाम धारणा आहे. सोबतच जागतिकीकरण, तंत्रज्ञान- विज्ञान व समाजकारण आदी विषयात त्यांचा दांडगा अनुभव आहे. सध्या केंद्रातील सरकारकडून होत असलेल्या वैचारिक गळचेपीविरोधात कुमार केतकर यांच्यातील व्यांसगी पत्रकार मोदी सरकारवर हल्ला चढवेल असे बोलले जात आहे. त्याचमुळे दिग्गजांना डावलून राहुल गांधींच्या टीमने कुमार केतकर यांना संधी दिल्याचे मानले जात आहे.

 

काँग्रेसमधून राजीव शुक्ला, रजनी पाटील, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, अविनाश पांडे, रत्नाकर महाजन, विलास मुत्तेमवार यांच्यासह एकून 12-13 नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, काँग्रेस हायकमांडने केतकर यांच्या नावाला पसंती दिली आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, केतकर यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल करतानाचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...