आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेऱ्यात कैद झाला खून, जमिनीच्या वादाने गेला युवकाचा जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिवंडीत भर बाजारात झालेला खून. - Divya Marathi
भिवंडीत भर बाजारात झालेला खून.

मुंबई- भिवंडी येथे एका युवकाचा खुलेआम खून करण्यात आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका युवकावर भर बाजारात काही लोक हल्ला करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

 

 

लोक पाहत होते तमाशा
- भिवंडी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी पंकज म्हात्रे नावाचा एक युवक आपल्या मित्रांसमवेत उभा होता. त्याचवेळी अभिषेक नावाचा एक युवक आपल्या साथीदारांसह तेथे आला आणि त्यांनी पंकज म्हात्रेवर हल्ला केला.
- त्यांनी चाकू आणि काही धारदार हत्यारांनी पंकजवर अनेक वार केले. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेले पंकज म्हात्रे जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारादरम्यान म्हात्रे यांचा मृत्यू झाला.
- घटनेनंतर सगळे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. ज्यावेळी पंकजवर हल्ला झाला त्यावेळी त्याच्या मित्रांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. 

 

 

दोन्ही कुटूंबात होता जमिनीवरुन वाद
- पोलिसांनी खूनानंतर तीन दिवसांनी गुरुवारी संध्याकाळी मुख्य आरोपी पंकजला अटक केली. अन्य एक आरोपी मोगेश याला अजून अटक करण्यात आलेली नाही.
- भिवंडीतील काल्हेर गावात पंकज म्हात्रे आणि मोगेश म्हात्रे यांच्यात जमिनीवरुन वाद होता. ती जमीन आपली असल्याचे दोघांचेही म्हणणे होते. हा वाद कोर्टात गेला होता. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...