आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅग्नेटिक महाराष्ट्र : देश 5 ट्रिलियन डॉलर क्लबमध्ये सामील होईल :पंतप्रधान नरेंद्र मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. १६ हजार कोटी खर्चून हा प्रकल्प उभा राहील. सविस्तर. पान ३ - Divya Marathi
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. १६ हजार कोटी खर्चून हा प्रकल्प उभा राहील. सविस्तर. पान ३

मुंबई- नवीन कायदे, व्यावसायिकांना सुविधा, राज्यांमध्ये तयार होत असलेले पायाभूत सुविधांचे जाळे यामुळे देश लवकरच ५ ट्रिलियन डॉलर क्लबमध्ये समाविष्ट होईल. गुंतवणूकदारांना विकासात्मक मैत्रीचे वातावरण तयार केल्यामुळेच हे शक्य होत आहे. महाराष्ट्रात आगामी काही वर्षांत ३ ट्रिलियन डॉलर गुंतवणूक आणण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्धार केला आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असल्याने त्यांना यात नक्की यश मिळेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुंबईत मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-२०१८ या जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेचे उद््घाटन करताना व्यक्त केला.


महाराष्ट्र सरकारने यापूर्वी कधीही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एवढ्या भव्य प्रमाणात गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले नव्हते. मात्र, मेक इन इंडियाला राज्यात मिळालेल्या यशाने प्रेरित होऊन प्रथमच अशा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद््घाटन करण्यात आले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. 

 

मेक इन इंडियात कामगिरी कौतुकास्पद : मला मॅग्नेटिकचे विज्ञान कळत नाही परंतु तुम्ही जेवढे केंद्राच्या जवळ असता तेवढी तुमची चुंबकीय शक्ती जास्त असते. मेक इन इंडियामध्ये महाराष्ट्राने जास्त गुंतवणूक प्राप्त केली, अशा शब्दांत मोदींनी कौतुक केले. १६-१७ मध्ये ५१ % एफडीए महाराष्ट्रात आला. ४ लाख कोटींचे करार झाले. २ लाख कोटींच्या प्रोजेक्टवर काम सुरू झाले.  गुजरातने जे सुरू केले त्याचा परिणाम देशात दिसत आहे, असे मोदी म्हणाले.


मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या स्वप्नाबद्दल सांगावे : आनंद महिंद्रा
महाराष्ट्रातच आमचा समूह वाढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने आम्ही १ हजार गावांचा विकास करीत आहोत. ग्रामीण भागाबाबत मुख्यमंत्र्यांची अनेक स्वप्ने आहेत. परंतु मी त्यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचे मुंबईबद्दलचे स्वप्नही सांगावे, असे ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा या वेळी म्हणाले. कांदिवली येथे १७०० कोटी रुपये गुंतवणूक करून बॉलीवुड टूरिजम उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


चौथ्या औद्योगिक विकासाची सुरुवात : मुकेश अंबानी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या भारताचे पाहिलेले स्वप्न सगळ्यांना भावले आहे. त्यामुळेच देशात आणि राज्यात गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास पुढे सरसावत आहेत. आम्ही मूळचे गुजरातचे असलो तरी धीरुभाई अंबानी यांनी मुंबईतच रिलायन्सची सुरुवात केली. आत्ताच आम्ही नेट कनेक्टिव्हिटीसाठी जिओची सुरुवात केली. डेटा यूजमध्ये १५५ व्या क्रमांकावर असलेला आपला देश आज पहिल्या क्रमांकावर आहे. प्रत्येक गाव,शाळा, रुग्णालय नेट कनेक्ट करण्याची योजना असून पुढील १० वर्षात ६० हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याचे रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी म्हणाले.

 

नवीन भारताच्या निर्मितीसाठी कायदेबदल
नवीन भारताच्या निर्मितीसाठी जेथे कायदे बदलण्याची गरज आहे तेथे ते बदलले जात आहेत. जेथे कायदे संपुष्टात आणण्याची गरज आहे तेथे संपुष्टात आणले जात आहेत. १४०० कायदे आतापर्यंत रद्द केले. जे नवीन कायदे बनवले जातात त्यात व्यावसायिकांसाठी गोष्टी सुलभ होतील याची काळजी घेतली जात आहे. धोरणांत बदल केल्याचा लाभ समाजातील गरीब, मध्यमवर्गीय आणि उद्योगपतींना मिळत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

 

३०० फिनटेक स्टार्टअप
परिषदेला सुरुवात करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, मेक इन इंडियाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही या परिषदेचे आयोजन केले आहे. फिनटेक धोरण नुकतेच जाहीर केले. आगामी काळात ३०० फिनटेक स्टार्टअप सुरू होतील. महाराष्ट्रात ३ ट्रिलियन डॉलर गुंतवणूक आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही त्यात आगामी काळात नक्कीच यशस्वी होऊ.

 

महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य द्या : रतन टाटा
या वेळी उद्योगपती रतन टाटा म्हणाले, गेल्या ३ वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांमुळे पायाभूूत सुविधांमध्ये चांगली वाढ होत आहे. मी मुकेश अंबानींचे अभिनंदन करतो. त्यांनी राज्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवली. गुंतवणूकदारांना माझा सल्ला आहे की महाराष्ट्राचा प्राधान्याने विचार करावा. 
- मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या स्वप्नाबद्दल सांगावे : आनंद महिंद्रा
- चौथ्या औद्योगिक विकासाची ही तर सुरुवात : मुकेश अंबानी

 

राज्य सरकारमुळेच यश
तीन वर्षांत महाराष्ट्रात गुंतवणूक मजबूत करण्यासाठी फडणवीस सरकारने अथक प्रयत्न केले.  त्यामुळेच वर्ल्ड बँकेच्या इज ऑफ डुइंगमध्ये राज्याने प्रथम क्रमांक मिळवला. फडणवीस सरकारने चांगले निर्णय घेतले. पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम आला. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरला जगात १०० मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळख मिळाली, असे मोदी म्हणाले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...