आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Maha Budget आरोग्‍य: 'आयुष्यमान'साठी निधी; राज्य योजनेचे 'कुपोषण'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रात भरीव तरतूद केलेली नाही. केंद्राच्या योजनांसाठी निधी दिला गेला आहे. गेल्या अर्थसंकल्पात मात्र जिल्हा, उपजिल्हा, सामान्य रुग्णालयांत  आरोग्य सुविधेसाठी तरतूद केली होती. शिवाय केंद्राने ‘आयुष्मान’ योजनेद्वारे आरोग्य सुविधेसाठी भरघोस तरतूद केल्याने राज्याने आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.


राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी ९६४ कोटींची तरतूद अाहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या निधीतही गेल्या वेळी १, ३१६ कोटींची तरतूद होती. ती ५७६ कोटी ५ लाखांपर्यंत खाली आणली आहे. पंतप्रधान मातृ वंदना योजनेतंर्गत दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील गर्भवती महिलांना शेवटच्या टप्प्यात काम करावे लागू नये म्हणून ५ हजार रुपयांची रक्कम लाभार्थीच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते. यासाठी ६५ कोटींची तरतूद आहे. सिंधुदुर्गमध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी दिला. हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेच्या बळकटीकरणासाठी व संशोधनास चालना देण्याच्या दृष्टीने संस्थेत राष्ट्रीय सर्पविष संशोधन संस्था स्थापन करणे, इमारत बांधकामासाठी ३ कोटी ५० लाखांची तरतूद आहे.  


पुढील स्‍लाइडवर पाहा, ग्रामीण, शहरी भागावर भर... 

बातम्या आणखी आहेत...