आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वाजता सुरू करून 4 वाजता संपणारा अर्थसंकल्प पहिल्यांदाच पाहिला- अजित पवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आहे. दोन वाजता सुरू करून चार वाजता संपणारा अर्थसंकल्प कधी पाहिला नव्हता. अर्थसंकल्पात शेतकरी, महिलांबाबत काही ठोस निर्णय घेतलेले दिसून येत नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे.

 

निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सरकारने महापुरुषांच्या स्मारकाला जास्तीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अर्थसंकल्पात फक्त शब्दांचा आणि आकड्यांचा खेळ दिसून आला. सरकारने समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हाती घेतले आहे पण त्यासाठीचा आराखडा स्पष्ट नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.

 

अजित पवार म्हणाले, जीएसटीच्या माध्यमातून 28 फेब्रुवारीपर्यंत 45 हजार कोटी रक्कम जमा झालेली आहे असे अर्थसंकल्पात सांगितले आहे. मग 7 व्या वेतन आयोगात आम्ही पुरेशी तरतूद करू, गरजेपुरती तरतूद करू असे म्हटले जाते पण ठोस निर्णय घेतला जात नाही. सरकारने अर्थसंकल्पाची वेळ मारून नेली आहे, अशी टीका त्यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...