आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Maha Budget: जाणून घ्या गतवेळच्या अर्थसंकल्पातील घोषणांचा काय झाले?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा 2017-18 चा अर्थसंकल्प सादर करताना अनेक घोषणा केल्या होत्या. यापैकी काही घोषणा प्रत्यक्षात येऊ शकल्या तरी काही घोषणा हवेतच विरल्या.

 

 

गतवेळीच्या अर्थसंकल्पातील ऊस खरेदी करमाफी, सॉईल टेस्टींग किटवर करमाफी, द्युतदाहिनी व गॅसदाहिनीवरचा कर शून्य, छोट्या शहरातील विमानतळांवरचे कर कमी,  तांदुळ, गहू, डाळी व त्यांचे पीठ तसेच हळद, मिरची, चिंच, गूळ, नारळ, धणे, मेथी, सुवा, पापड, ओला खजूर यांचेवरील करमाफी सुरु ठेवणार. आमसुलास नव्याने करमाफी, सोलापूरी चादर व टॉवेलवर करमाफी, मधुमका प्रक्रिया उद्योगास विक्रीकर माफ या घोषणांची सरकारने अंमलबजावणी केली. तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता. तो मात्र अद्याप लागु झालेला नाही. पोलिसांसाठी गृहनिर्माणास चालना देण्यासही मर्यादीतच यश मिळालेले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था कॅशलेस केली जाणार हे तर दिवास्वप्नच ठरले आहे. 28 हजार ग्राम पंचायती डिजिटल करण्याचे उदिष्टही गाठता आलेले नाही.  शालेय विद्यार्थिंनींना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यातही सरकारला पुरेसे यश आलेले नाही. 

 

 

नद्यांच्या शुद्धीकरणाचं काम प्राधान्याने हाती घेण्याची घोषणाही घोषणाच ठरली असल्याचे राज्यातील नद्यांची स्थिती लक्षात घेतल्यास लक्षात येते. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी 990 कोटी 26 लाखांची तरतूद करण्यात आलेली होती. पण मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करण्यात किती यश आले हे पुणेकरच सांगू शकतील. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार घरे शहरी भागात बांधण्याचे आश्वासन दिलेले होते. तेही प्रत्यक्षात आलेले नाही. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...