आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई: यंदाचा अर्थसंकल्प अनेक बाबींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येत्या काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी फडवणीस सरकारच्या या शेवटच्या अर्थसंकल्पाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. इतिहासात प्रथमच यंदा मूकबधिरांसाठी साइन लँग्वेजमध्ये अर्थसंकल्पाचे राज्य सरकार प्रक्षेपण आपल्या www.maharashtra.mygov.in या वेबसाइटवरून करणार आहे.
यामुळे कर्णबधिर, मूकबधिर व्यक्तींनाही अर्थसंकल्पातील तरतूदी समजून घेण्यास मदत होणार आहे.. राज्य सरकार तसेच हेलेन केलेर या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
तथापि, राज्याचा 2017-18 चा आर्थिक पाहणी अहवाल काल (गुरुवारी) विधानसभेत मांडण्यात आला. घटत्या विकास दरासह कृषी क्षेत्राची नकारात्मक वाढ, वाढते कर्ज, 4511 कोटींची वित्तीय तूट अशी चिंताजनक स्थिती अहवालातून समोर आली आहे.
आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 12.5 % दराने वाढणारे कृषी क्षेत्र आगामी आर्थिक वर्षात उणे 8.3 टक्के दर दर्शवण्याची शक्यता अहवालात वर्तवली आहे. तीन वर्षांतील हा नीचांक आहे. राज्यात 2016-17 मध्ये सरासरी चांगला 94.9% पाऊस पडल्याने त्या वेळी कृषी उत्पादन जास्त झाले, तर 2017-18 मध्ये सरासरी 84.3% पाऊस पडल्याने कृषी व संलग्न क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत वजा 8.3% वाढ अपेक्षित असल्याचे सरकारने म्हटले आहे. या घसरणीचे खापर सरकारने अपुऱ्या पावसावर फोडले. कापूस उत्पादनात 44% घट दाखवताना त्यात बोंडअळी व बनावट एचटी बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे वास्तव मात्र सरकारने लपवले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.