आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या छतावर शेड उभारुन बनवले विमान, सरकारने केला 35000 कोटींचा करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- असे म्हणतात की नशीब बदलण्याची वाट पाहत बसू नका. आपले काम करत राहा. एक दिवस तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. मुंबईतील अमोल यादव यांच्याबाबत हे सत्य ठरले आहे. अमोल यादव यांनी विमान वनबून ते आपल्या घराच्या छतावर ठेवले होते. त्यामुळे ते प्रकाशझोतात आले होते. त्यावेळी त्याचा हा प्रकल्प मुंबईतील मेक इन इंडिया प्रदर्शनात मांडण्यात आला होता. आता महाराष्ट्र सरकारने अमोल यादव यांच्यासोबत 35 हजार कोटींचा करार केला आहे.

 

 

कसे बदलले अमोल यादव यांचे नशीब
- महाराष्ट्र सरकारने अमोलची कंपनी थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रा. लिमिटेडला 20 सीटर विमाने बनविण्यासाठी एक कारखाना स्थापन करण्याची परवानगी दिली आहे. हा कारखाना पालघर जिल्ह्यात होणार आहे. यासाठी 35 हजार कोटी रुपये लागणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी यादव यांच्या कंपनीसोबत एक करारही केला आहे.

 

 

कधीकाळी सोडणार होते देश
जेट एअरवेजमध्ये डिप्युटी चीफ पायलट असणाऱ्या अमोल यांनी घराच्या छतावर 19 वर्षे मेहनत केल्यावर एक विमान बनवले होते. हे एअरक्राफ्ट 2011 मध्ये बनले होते. त्याच्या प्रमाणपत्रासाठी अमोल प्रयत्न करत होते. एकवेळ अशी आली होती की लालफितीच्या आणि प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून त्यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांनी हा निर्णय मागे घेतला.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...