आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून राज्यसभेसाठी चौथा उमेदवार: विजया रहाटकरही मैदानात; निवडणुकीत रंगत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजया रहाटकर..... - Divya Marathi
विजया रहाटकर.....

मुंबई- महाराष्ट्रातून पुढील महिन्यात रिक्त होत असलेल्या राज्यसभेसाठी सहा जागांसाठी भाजपने आपला चौथा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या रूपाने भाजपने सातवा उमेदवार दिला आहे. 15 मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर राज्यसभेची बिनविरोध निवडणूक टळणार आहे. दरम्यान, आपल्या पक्षाच्या एखाद्या उमेदवाराचा अर्ज रद्दबादल ठरू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून रहाटकर यांचा अर्ज दाखल केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

 

भाजपने यापूर्वीच नारायण राणे, प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेतील सदस्य संख्याबळानुसार भाजपचे तीनच उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, भाजपने आता चौथा उमेदवार दिला आहे.

 

तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी 1-1 उमेदवार निवडून येऊ शकतो. यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकर यांना संधी दिली आहे तर, शिवसेना व राष्ट्रवादीने आपापले विद्यमान खासदार अनिल देसाई आणि वंदना चव्हाण यांना रिंगणात उतरवले आहे.

बातम्या आणखी आहेत...