आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. रहाटकर यांच्या माघारीमुळे महाराष्ट्रातील सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण व शिवसेनेकडून अनिल देसाई हे उमेदवार होते, तर भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नारायण राणे व केरळचे भाजपचे पदाधिकारी व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी देण्यात आली होती.
विधानसभेतील असे आहे सध्याचे संख्याबळ-
भाजप व मित्रपक्ष- 122
शिवसेना- 63
काँग्रेस- 41
राष्ट्रवादी- 41
शेकाप 3
बहुजन विकास आघाडी-3
एमआयएम – 2
मनसे – 1
सपा – 1
भारीप – 1
माकप – 1
अपक्ष-7
पुढे स्लाईडद्वारे पाहा, राज्यसभेवर निवडून गेलेल्या उमेदवारांचे फोटोज....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.