आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा अध्यक्ष बागडेंवर विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव; पक्षपातीपणाचा अारोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर सभागृहातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत सोमवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. लक्षवेधी सूचना थांबवण्यासाठी विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लाच मागितल्याच्या कथित आॅडिअो क्लिपप्रकरणी विधानसभेत भाजप सदस्यांनी चौकशीची मागणी केली. तसेच सत्ताधारी भाजप सदस्यांनी राष्ट्रवादी आणि मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देत गोंधळ घातला. विरोधकांनी त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी अध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला. 


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशाच्या कामकाजास सोमवारी सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कथित आॅडिओ क्लीपमुळे सभागृहाची शान गेली आहे. संसदीय परंपरेबाबत सर्वत्र संभ्रम, अविश्वास निर्माण झाला आहे. सभागृहाकडे संयशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी विधानपरिषद सभापतींनी एक संयुक्त समिती नेमावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. धनंजय मुंडे प्रकरणी मुख्यमंत्री निवेदन करत असताना भाजपाचे आमदार उभे राहून राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. मुख्यमंत्र्यांच्या मागणीला राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सभागृहातील सत्ताधारी भाजप सदस्यांचा गांेधळ कमी झाला नाही. शेवटी अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.त्या ऑडिओ क्लीपबाबत धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या सर्व मंत्र्यांच्या चौकशीची तयारी दाखवावी, असे आव्हान राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी दिले.
चौकशीला विरोधकांची तयारी : अजित पवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आॅडिओ क्लिपच्या चौकशीला राष्ट्रवादी व काँग्रेसची तयारी आहे, असे सांगितले. मात्र सरकारला सभागृह चालवायचे नाही त्यामुळे सभागृह सत्ताधारी बंद पाडत आहेत, असा आरोप करण्यात आला. 


विरोधकांची गळचेपी होतेय : शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी नुकसान भरपाई अशा कोणत्याच मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष विरोधकांना बोलू देत नाहीत. विरोधकांच्या हक्कांची गळचेपी केली जात आहे. निष्पक्षपातीने सभागृह चालवण्याची भूमिका अध्यक्ष विसरले आहेत, म्हणूनच शेकाप, समाजवादी, माकप अशा सर्व विरोधी बाकावरील सदस्यांनी अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

 

पक्षपातीपणाचा अारोप 
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे पक्षपाती आहेत, त्यांना पदावरून दूर करण्यात यावे, ते नियमबाह्य कामकाज चालवतात, असे आरोप करत विरोधकांनी नियम ११ अन्वये विधिमंडळ सचिवांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. १४ दिवसांनी ताे प्रस्ताव विधानसभेत चर्चेसाठी येईल. तेव्हा त्यावर विरोधक आपली भूमिका मांडतील.

 

प्रक्रिया : २९ सदस्यांचे अनुमोदन आवश्यक 
घटनेच्या अनुच्छेद १७९ अन्वये अध्यक्षांवर अविश्वास सादर होतो. त्यासाठी १४ दिवस अाधी सूचना द्यावी लागते. १४ दिवसांनी अध्यक्ष तो प्रस्ताव वाचून दाखवतात. त्या वेळी २९ सदस्यांनी उभे राहून त्यास अनुमोदन द्यावे लागते. त्यानंतर सात दिवसांच्या आत ठराव चर्चेस येताे. २९ पेक्षा सदस्य कमी असल्यास ठराव रद्द होतो.

 

इतिहास : आजवर एकाही अध्यक्षाची बडतर्फी नाही 
सन १९३५ पासूनच्या विधानसभेच्या इतिहासात एकाही अध्यक्षाची अविश्वास प्रस्तावाने बडतर्फी झालेली नाही. नारायण राणे यांनी १९९९ ते २००२ दरम्यान अरुण गुजराथी व बाबासाहेब कुपेकरांवर ५ वेळा तर रामदास कदमांनी २००६ मध्ये कुपेकरांवर अविश्वास आणला होता. मात्र नंतर ताे मागे घेेण्यात अाला.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...