आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव स्फोट: तपास निष्कर्षांत विसंगती का? एनआयएला न्यायालयाकडून विचारणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- २००६ मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांच्या निष्कर्षांवर शंका उपस्थित केली आहे. या खटल्यात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या तीनही तपास यंत्रणा वेगवेगळ्या निष्कर्षाप्रत पोहोचल्या आहेत.  


सीबीआय आणि महाराष्ट्र एटीएसच्या तपासात हिंंदूत्ववादी संघटनेचे चार सदस्य आरोपी दाखवण्यात आले असताना एनआयएने ९ मुस्लिमांवर आरोपपत्र कसे काय दाखल केले?, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. नरेश पाटील आणि एन.डब्ल्यू. सांबरे यांच्या पीठाने केली आहे. २००६ मधील या बॉम्बस्फोटात ३७ लोकांचा बळी गेला होता. सुरुवातीला एटीएसने याप्रकरणी चौकशी केली आणि आरोपींना अटक केली. त्यानंतर वर्षभराने हे प्रकरण सीबीआयकडे गेले आणि मग २०११ मध्ये ते एनआयकडे वर्ग करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...