आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर झाली मैत्री, सेक्सला नकार दिल्याने केली युवतीची हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालघर - नालासोपारामध्ये पोलिसांनी एका युवतीच्या हत्ये प्रकरणी 25 वर्षीय युवकाला अटक केली आहे. युवक आणि युवतीची फेसबुकवर मैत्री झाली होती. युवकाने तिला आपल्या घरी बोलावले व सेक्सची मागणी केली. तिने नकार देताच गळा आवळून खून केला.
 
काय आहे प्रकरण.. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा मध्ये राहणारा हरीदास निरगुडे (25) आणि पीडित मुलगी अंकिता मोरे (20) यांची काही दिवसांपूर्वी फेसबूकवर मैत्री झाली होती. हरिदासने अंकिताला आपल्या नालासोपारा येथील घरी बोलावले. त्यानुसार अंकिता त्याच्या घरी आली. ती घरी येताच हरिदासने तिच्याकडे सेक्सची मागणी केली. तिने नकार देताच त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दोरीने गळा आवळून तिचा खून केला. यानंतर तिचे प्रेत निर्जन ठिकाणी फेकून दिले.पोलिस तपासात हरिदासनेच अंकिताचा खून केल्याचे समोर आले. त्याला अटक करण्यात आली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...