आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिले नसतील शिवाजी महाराजांचे हे दुर्मिळ Photos, अनेक चित्र विदेशात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे चित्र ब्रिटिश म्युझियममधील आहे. - Divya Marathi
हे चित्र ब्रिटिश म्युझियममधील आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसाचे दैवत आहे. कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता जो लढणारा आहे, शूर आहे तो माझा मावळा आहे आहे सांगत शिवाजी महाराजांनी आपले सैन्य उभे केले. शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. या निमित्ताने आम्ही शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ फोटोंचा खजिना घेऊन आलो आहोत. 

 

महाराजांची बरीच चित्रे विदेशात..
छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चित्रकारांनी काढलेली देखणी चित्रे काढली होती, आजही अनेक चित्रे उपलब्ध आहेत. त्‍यापैकी बरीचशी चित्रे ही विदेशात आहेत. महाराजांच्‍या काही चित्रांवर तारखांचा उल्‍लेख नाही. मात्र, संग्रह करणाऱ्यांनी केलेल्‍या लिखाणाच्‍या आधारावर या चित्रांचा काळ ठरवतो येतो. त्‍या अनुषंगाने DivyaMarathi.Com या संग्रहातून आपल्‍यासाठी महाराजांची विविध चित्रे घेऊन आले आहे. 

 

- 1672 च्या दरम्‍यान मनुचीने भारतातील 56 राजे-महाराजे-बादशाहांची चित्रे तयार केली होती.
- ही चित्रे त्‍यांनी मीर महम्मद कडून तयार करुन घेतली होती.
- या संग्रहात एक चित्र शिवाजी महाराज यांचेही होते.
- मनुचीने घेतलेले चित्र सध्‍या पॅरीसमध्‍ये आहे.
- शिवाजी महाराज यांची विविध चित्रे विदेशात आहेत.
- राजस्‍थानमध्‍ये राजपुती शैलीत काढलेले चित्र, टाटा कलेक्शनमधील, फ्रान्सच्या राष्ट्रीय
ग्रंथालयातील व बर्लिन स्टेट लायब्ररीतील चित्रे प्रसिद्ध आहेत.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, शिवाजी महाराजांचे दुर्मिळ फोटो... 

बातम्या आणखी आहेत...