आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे नेते शिशिर शिंदे पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर, मीडिया रिपोर्ट्सचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अनेक दिवसांपासून चर्चेबाहेर असलेले मनसेचे नेते शिशिर शिंदे पुन्हा शिवसेनेत जाण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबत दावा करण्यात आला आहे. या रिपोर्ट्सनुसार शिंदे यांची शिवसेनेतील नेत्यांबरोबर याबाबत चर्चा झाली असल्याचा दावाही करण्यात आला आहे. 

 

शिशिर शिंदे यांना मनसेत राहण्याची इच्छा नसून त्यांनी शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वाहिनेने दिलेल्या वृत्तानुसार शिशिर शिंदे यांना आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत किरिट सोमैय्या यांच्या विरोधात मैदानात उतरवण्याचा विचार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना चाचपणी करत असल्याची माहिती मिळाली आहे. 


मनपा निवडणुकीत दिसले नाही
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेच्या प्रचारामध्ये किंवा एकूणच निवडणूक प्रक्रियेमध्ये शिशिर शिंदे यांनी अनुपस्थिती जाणवली होती. त्यामुळे तेव्हाच शिशिर शिंदे नाराज असल्याच्या काही चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे समोर आल्याने, लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...