आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मराठी सम्राटात अस होतं अनोख नातं, वाचा दादा कोंडके अन् बाळासाहेबांतील किस्से!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांच्‍यातही एक नाते होते. बाळासाहेबांचे मराठी विषयीचे प्रेम आणि रसिकता यामुळे त्‍यांच्‍यात आणि दादांमध्‍ये विशेष जवळीक होती. बाळासाहेब हे एक व्यक्ती म्हणून दादा कोंडकेंना आवडायचेच पण मराठी माणसांसाठी हा माणूस काहीतरी करतो म्हणून ते जाम फिदा असायचे. त्याचमुळे कोणतेही तमा न बाळगता ते शिवसेनेचा प्रचार करायचे. मराठी चित्रपटांना आजच्या हिंदी निर्मात्याच्या लॉबिंगपुढे जसे गप्प पडावे लागते तसेच पूर्वीच्या काळीही तसं होत होतं किंबहूना आता पेक्षाही पूर्वी वाईट स्थिती होती. एकदा दादा कोंडकेंचा चित्रपट थिएटवरवाले लावत नव्हते. मग याची माहिती बाळासाहेबांना कळाली मग काय दादा कोंडकेंचा चित्रपट लावणार नसतील तर ‘मराठा मंदिर’ वर राडा करण्‍याचा आदेश शिवसैनिकांना सोडला होता. दादा कोंडके यांच्या 20 व्या (14 मार्च 1998) पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया बाळासाहेब आणि दादा कोंडके यांच्‍या अनोख्या नात्याविषयी, प्रेमाविषयी......

 

- तेव्‍हा मुंबईमध्‍ये मराठी चित्रपट केवळ परळच्या ‘भारतमाता’ सिनेमात लागत होते. 
- इतर चित्रपटगृहांचे मालक मराठी चित्रपट लावायला नकार देत होते. 
- दादांचा सोंगाड्या आणि एकटा जीव ‘भारतमाता’मध्‍येच लागले, पण फार कमाई झाली नाही. 
- कारण हे थिएटर लहान, त्यात पुन्हा तिकीट दीड रुपया अन् अडीच रुपये होते.

 

गुंड बोलावून दादांना काढले होते बाहेर.....

 

- 'राम राम गंगाराम'च्या वेळी दादांना दादरचे मराठा मंदिर हवे होते, मराठा मंदिरचा पारशी मालक दादांना तयार नव्‍हता. 
- त्याचवेळी ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘बॉबी’ हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार होते. 
- दादांनी मराठा मंदिरचा मालक फिरदोस तारापोरवाला बरोबर चार महिने आधी ‘मॉर्निंग शो’चा करार केला होता. 
- तारापोरवाल्‍याने दादांकडे पाठ फिरवली. 
- दादा कोंडके यांच्‍या चित्रपटाला मराठा मंदिर द्यावे म्‍हणून ग्रामीण भागातूनही मागणी वाढली होती. 
- दादांनी तारापोरवाल्याला थिएटरवर जाऊन हात जोडले, पण तो ऐकून घेत नव्‍हता. 
- तारापोरवाल्याने गुंड बोलावले. दादांना बाहेर काढले. मग दादा थेट बाळासाहेबांकडे गेले.

 

पुढे स्‍लाईड्सवर वाचा, पुढे नेमके काय घडले..

 

संदर्भ - इसाक मुजावर लिखित "एका सोंगाड्याची बतावणी'

बातम्या आणखी आहेत...