आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai Plane Crash: 2012 मध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानासोबतच UP सरकारने केली होती या विमानाची विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात महिला वैमानिकासह एकूण पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात तीन तंत्रज्ञ व एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू समावेश आहे. अपघातग्रस्त चार्टर्ड विमान उत्तर प्रदेश सरकारने कोठारी बंधू यांच्या यूआय एव्हिएशन कंपनीला विकले होते.

 

अपघातग्रस्त विमानासोबत यूपी सरकाने काढले होते विक्रीला
गुरुवारी अपघाग्रस्त झालेले विमान 2013 मध्ये यूपी सरकारने एका दुसऱ्या एका अपघाग्रस्त विमानासोबत विक्रीला काढले होते. कोठारी बंधूंच्या  यूआय एव्हिएशन या खासगी कंपनीने ते 2014 मध्ये खरेदी केले होते. 
ज्या विमानासोबत त्याची विक्री झाली होती ते होते ते 40 कोटी रुपयांचे सहा आसनी एअरक्राफ्ट Premier-1A (VT-UPN) होते.  त्या विमानाची सप्टेंबर 2012 मध्ये क्रॅश लँडिंग झाली होती. त्यात तेव्हा यूपीचे तत्कालीन मंत्री शिवपाल यादव व वरिष्ठ सरकारी अधिकारी बसलेले होते.  तथापि, त्या अपघातग्रस्त विमानाची विक्री झाली की नाही, याची खात्रीलायक माहिती नाही. मात्र, त्याच वेळी घाटकोपरमध्ये गुरुवारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या King Air C90A (VT-UPZ) या विमानाची विक्री झाली होती. तेव्हा या विमानासोबतच Super King Air 300LW (VT-UPA), Beech Bonanza A-36 (VT-UPY) आणि Chetak helicopterचा विक्रीला काढलेल्या विमानांमध्ये समावेश होता.
Premier-1Aचा सप्टेंबर 2012 मध्ये अपघात झाल्यापासून ते पुढे बरचे दिवस धूळखात पडून होते. पैकी Super King वर्किंग स्टेटमध्ये होते. मात्र इतर विमानांनीही जास्त उड्डाणे घेतली नव्हती. 

 

दुर्दैवी घटना
कोठारी बंधू यांच्या यूआय एव्हिएशन कंपनीने 2014 मध्ये व्हीटी यूपीझेड किंग एअर सी- 90 हे विमान उत्तर प्रदेश सरकारकडून खरेदी केले. विमानाच्या डागडुजीनंतर गुरुवारी सकाळी पूजा करण्‍यात आली. श्रीफळ फोडून जुहू हेलिपॅडवरून टेस्टिंगसाठी विमानाने उड्डाण घेतले. परंतु दुपारी दीड वाजेच्या दरम्यान विमान घाटकोपरमध्ये कोसळले.
या दुर्घटनेत महिला वैमानिक मारिया कुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ मनीष पांडे आणि सुरभी यांचा जागीच मृत्यू झाला. विमान कोसळल्याने पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला.

 

UP सरकारचे स्पष्‍टीकरण
चार्टर्ड विमान यूपी सरकारकडे असताना त्याचा अपघात झाला होता. त्यानंतर हे विमान सरकारने विक्री काढले होते, अशी माहिती यूपी सरकारचे मुख्य सुरक्षा सल्लागार अवनिश अवस्थी यांनी दिली आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...