आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या निमंत्रणात केली चूक; सोशल मीडियावर झाला चर्चेचा विषय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची उत्सुकता मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासहित संपूर्ण राज्यात आहे. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणार आहेत.

 

मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेचे निमंत्रण सर्वांपर्यंत पोहोचले आहे. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरूनही याबद्दल आवाहन करण्यात आले आहे. पण हे निमंत्रण देताना एक मोठी चूक झाल्याचे दिसत आहे. सभा संध्याकाळी 5 ते 9 असताना सकाळच्या 5 ते 9 ची वेळ यामध्ये देण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत पेजवर AM आणि PM चा घोळ हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती