आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा पोटनिवडणूक निकाल: मुंबईत शिवसेना, पुण्यात राष्ट्रवादी तर नगर- सोलापुरात काँग्रेस विजयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई महानगरपालिकेत सायनमधील प्रभाग क्रमांक 173 मध्ये शिवसेनेचे रामदास कांबळे यांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या रामदास कांबळे यांनी विजय खेचून आणत काँग्रेसचे उमेदवार सुनील शेट्टी यांना 845 मतांनी पराभूत करत सहजपणे विजय मिळवला. शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत शिवसेनेवर या प्रभागातील लोकांचा विश्वास कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.भाजपने या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनाला पाठिंबा दिला होता.

 

पुण्यात राष्ट्रवादीच्या जाऊबाई जोरात- 

 

पुण्यातील मुंढवा येथील प्रभाग- 22 मध्ये राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला. माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या जाऊबाई पूजा कोद्रे यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले होते. यात पूजा कोद्रे यांना 8991 मते मिळाली तर शिवसेनेच्या उमेदवार मोनिका तुपे यांना 5470 मते मिळाली. भाजपच्या उमेदवार सुकन्या गायकवाड यांना 4334 मते मिळाली.

 

सोलापूरात काँग्रेसने आपली जागा राखली- 

 

सोलापूरातही काँग्रेसने विजय मिळवत आपली जागा राखली. प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेसचे उमेदवार तौफिक हत्तुरे यांनी विजय मिळवला. काँग्रेसचे तौफीक हत्तुरे यांनी एमआयएमचे पीर अहंमद शेख यांचा सुमारे 1 हजार मतांनी पराभव केला. हत्तुरे यांना 4361 मते मिळाली तर पीर अहमद शेख यांना 3340 मते मिळाली. काँग्रेसचे नगरसेवक रफीक हत्तुरे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कॉंग्रेसने त्यांचे बंधू तौफीक यांनाच उमेदवारी दिली. 

 

अहमदनगरमध्येही काँग्रेसच- 

 

अहमदनगरमध्ये मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय खेचून आणला. महानगरपालिकेच्या केडगावमधील प्रभाग क्रमांक 32 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमदेवार विशाल कोतकर सुमारे साडेचारशे मतांनी विजयी झाले आहेत. चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने गड राखला तर भाजपाला डिपॉझिट वाचवणेही अवघड झाले. 

 

काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यानं रिक्त झाल्याने प्रभाग क्र. 32 ची पोटनिवडणूक पार पडली. भाजपचे उमेदवार महेश सोले यांना फक्त 156 मतं मिळाल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झालं आहे. तुलनेने शिवसेनेच्या पटारे यांनी चांगली मते घेतली आहेत. 

 

नाशिकमध्ये मनसेची बाजी-

 

नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 (क) च्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैशाली भोसले यांनी विजय मिळवला आहे.

 

मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे मनसेने या निवडणुकीसाठी भोसले यांच्या घरातच वैशाली भोसले यांना उमेदवारी दिली होती. तर, शिवसेनेकडून चव्हाण आणि भाजपकडून विजया लोणारी यांनी निवडणूक लढविली. मात्र, मनसेने मोठा विजय मिळवला. या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेना, मनसे आणि भाजप या प्रमुख पक्षामध्ये तिरंगी लढत झाली होती.

 

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी-

 

उल्हासनगर महानगरपालिका पोटनिवडणूक प्रभाग क्रमांक 17- ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमन सचदेव विजयी झाल्या आहेत. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, विजयी उमेदवारांचे फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...