आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRA च्या बिल्डरांच्या घशात भूखंड घालण्याचा डाव उधळून लावू; आदित्य ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली माहीममधील नेचर पार्कवर एसआरए प्रकल्प राबविण्याचा राज्यसरकारने घाट घातल्याची माहिती उजेडात आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज नेचर पार्कला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी एसआरएच्या नावाखाली हा भूखंड बिल्डराच्या घशात घालण्याचा डाव शिवसेना उघळून लावेल, असे सांगितले.

 

 

आदित्य ठाकरे म्हणाले की, 'पूर्वी या ठिकाणी डंपिंग ग्राऊंड होते. आता एसआरए प्रकल्प आणि परवडणारी घरे निर्माण करण्याच्या नावाखाली राज्यसरकार बिल्डरांचा फायदा करायला निघाली आहे. आम्ही सरकारचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. आरे सारखी स्थिती निर्माण झाली तर आम्ही रस्त्यावर उतरून त्याला जोरदार विरोध करू.' 

 

 

'प्रत्येक सरकार हरकती आणि सूचना मागवत असते. त्यात काही नवीन नाही. पण सरकारच्या मनात काय आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे,' असे सांगतानाच 'आरे कारशेडसाठी पालिकेच्या विकास आराखड्यात हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. आम्ही त्या रद्द केल्या,' असे त्यांनी स्पष्ट केले. 'झाडे लावा, झाडे जगवाची मोहीम येथूनच सुरू झाली होती. सरकार झाडे लावण्याबाबत जागृती करत आहे आणि इकडे मात्र जंगल कापले जात आहे,' असा टोलाही त्यांनी हाणला. एसआरएच्या नावाखाली हा भूखंड बिल्डराच्या घशात घालण्याचा डाव माहीत होता की नाही? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. माहीत असेल तर त्यांनी हा हरितपट्टा वाचविण्याचा प्रयत्न का केला नाही? असा प्रश्न उपस्थित केला. 

 

 


 

 

बातम्या आणखी आहेत...