आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS मध्ये सामील झाला होता हा युवक, सांगितली आप बिती, म्हणाला चुकूनही जाऊ नका या मार्गावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हज यात्रेच्या नावाखाली शहरातील चार युवक 2014 मध्ये इराकला गेले होते. हे चारही जण नंतर दहशतवादी झाले असल्याचे समोर आले होते. यापैकी अरिब मजिद हा भारतात परतला. तेथून परतल्यावर त्याने ISIS क्रुर चेहरा जगाला सांगितला आहे.

 

 

तीन दिवस होता तडफडत, मिळत नव्हती मदत
- 23 मे 2014 रोजी कल्याण येथील अरिब आपल्या  फहाद शेख, शहीम टनकी आणि अमन तंदेल या मित्रांसोबत हजला जात असल्याचे सांगत बगदादला गेले. 
- तेथे पोहचल्यावर त्यांनी घरच्यांना फोन करुन आपण दहशतवादी झाले असल्याचे सांगितले. या घटनेमुळे त्यांच्या घरचे पुरते हादरले होते.
- सहा महिन्यानंतर मजिदने घरी फोन करुन आपला जीव धोक्यात असल्याचे सांगितले. मला वाचवा, असे आवाहन त्याने केले. त्यानंतर NIA ने वाचवले.
- पोलिसांना चौकशीत त्याने तेथील भीषण वास्तव आणि ISIS चा क्रुरपणा सांगितला.
- धर्माच्या नावावर दहशतवादी संघटना युवकांना चुकीच्या मार्गावर नेत असल्याचे त्याने नमूद केले आपण 3 दिवस गोळी लागल्यावर जखमी अवस्थेत तडफडत होतो. पण दहशतवाद्यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडून दिले होते. मला तिथेच माझी चुक झाल्याचे समजले. कशीबशी मी वैद्यकीय मदत मिळवली, असे त्याने सांगितले.

 

 

टॉयलेट धुण्याचे दिले काम
- मजिदने सांगितले की, दहशतवाद्यांनी आम्हाला अतिशय वाईट वागणुक दिली. त्यांनी आमच्याकडून संडासे स्वच्छ करुन घेतली. 
- त्यांनी आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिल्याचे त्याने नमूद केले. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...