आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात जनावरांना चरायला घेऊन गेलेल्या महिलेवर बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- जिल्ह्यात एका नराधमाने शेतात महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. बलात्कारानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

 

 

सोमवारी हदगाव तालुक्यातील डोरली या गावात राहणारी 29 वर्षांची विवाहित महिला शेतात जनावरांना चरायला घेऊन गेली होती. महिला शेतात चारा कापत असताना मारुती लोहटे या नराधमाने तिला गाठले. त्याने महिलेच्या तोंडात कापसाचा बोळा टाकून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी मारुती लोहटेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारुती लोहटेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...