आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - काेकणातील प्रस्तावित नाणार प्रकल्पाला विरोध होत आहे. काेकणवासीयांना हा प्रकल्प नकाे असल्यास ताे गुजरातला न नेता मराठवाड्यात अाणा, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निर्मूलन अाणि विकास मंच संघटनेने केली अाहे.
मंचचे संस्थापक अाणि अध्यक्ष डाॅ. संजय लाखे पाटील शुक्रवारी म्हणाले, नाणार प्रकल्प मराठवाडा, खान्देश अाणि विदर्भातील वऱ्हाड या दुष्काळी भागासाठी विकासाचे इंजिन ठरू शकतो. मुंबईसह उर्वरित महाराष्ट्र अाणि विदर्भाच्या बराेबरीने मराठवाड्याला न्यायचे असेल तर या भागात महाकाय प्रकल्प येण्याची गरज आहे. म्हणून नाणार प्रकल्पाची गरज आहे.
प्रतिनिधी/ मुंबई
काेकणातील नाणार प्रकल्पाला स्थानिक व भाजप वगळता सर्वच पक्षांनी कडाडून विराेध केला अाहे. या वादात आता मराठवाडा अनुशेष निर्मूलन च विकास मंच संघटनेने उडी घेतली अाहे. काेकणवासीयांना नाणार प्रकल्प नकाे असल्यास ताे गुजरातला न नेता मराठवाड्यात अाणा, अशी मागणी या संघटनेने केली अाहे.
नाणार प्रकल्पाकडे विकासाच्या दृष्टीने बघितल्यास मराठवाडा, खान्देश अाणि विदर्भातील वऱ्हाड प्रांत या दुष्काळी आणि अात्महत्याग्रस्त भागासाठी ताे खऱ्या अर्थाने विकासाचे इंजिन ठरू शकेल. मुंबईसह उर्वरित महाराष्ट्र अाणि विदर्भाच्या बराेबरीने मराठवाड्याला न्यायचे असेल तर या भागात महाकाय प्रकल्प येण्याची गरज असल्याचे मराठवाडा अनुशेष निर्मूलन अाणि विकास मंचचे संस्थापक व अध्यक्ष डाॅ. संजय लाखे पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
नागपूर करारात विनाअट मराठी भाषिक महाराष्ट्र राज्यासाठी सामील झालेल्या मराठवाडा प्रदेशावर विकासाच्या बाबतीत सातत्याने अन्याय झाला अाहे. मराठवाड्याला विदर्भ अाणि उर्वरित महाराष्ट्रापेक्षा अधिकचे दिले जाईल, असे अाश्वासन राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेत दिले हाेते. परंतु त्यानंतरच्या सर्वच राज्य सरकारांना मराठवाड्याचा विसर पडला. परंतु अाता नाणार प्रकल्पाच्या रास्त विराेधातून मराठवाड्याचा विकास घडवून अाणण्याची माेठी संधी अाहे. या माध्यमातून मराठवाड्यात माेठ्या प्रमाणावर गुंतवणूक हाेऊन राेजगाराच्या संधी माेठ्या प्रमाणावर उपलब्ध हाेतील. त्यामुळे नाणार प्रकल्प मराठवाड्यात अाणावा, अशी मागणी लाखे पाटील यांनी या वेळी केली.
खान्देश, विदर्भालाही फायदा
प्रकल्पामुळे शेजारील धुळे, नगर, नाशिक, नंदुरबार, वऱ्हाड प्रांतातील बुलडाणा, वाशीम, अकाेला, यवतमाळ या िजल्ह्यांना विकासाचा लाभ हाेण्यास मदत मिळेल. नाणार प्रकल्पाला विराेध करणाऱ्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांना यासंदर्भात अापण भेटणार असल्याचे लाखे पाटील यांनी स्पष्ट केले.
जालना ड्रायपाेर्टचा पर्याय
अाैरंगाबादच्या डीएमअायसीमधील शेंद्रा-बिडकीन परिसर या प्रकल्पासाठी याेग्य असून जालन्यात हाेत असलेल्या ड्रायपाेर्टचाही त्यासाठी विचार करता येऊ शकेल. जेएनपीटी येथून जालन्यापर्यंत तेलवाहतूक करणेही साेयीचे हाेऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत तातडीने विचार करावा, असेही ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.