आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाणार प्रकल्पाला वाढता विरोध, शरद पवार 10 मे रोजी कोकणात जाऊन ग्रामस्थांना भेटणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नाणार प्रकल्पाला स्थानिक जनतेचा असलेला विरोध वाढत चालला असून, या पार्श्वभूमीवर प्रकल्पविरोधी लोकांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दरम्यान, नाणार प्रकल्पाला वाढता विरोध लक्षात घेता पवार 10 मे रोजी नाणार येथे जाऊन ग्रामस्थ, शेतकरी आणि मच्छिमारांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत.

 

दुसरीकडे, मुंबईतील परळ भागातील शिरोडकर हायस्कूलमध्ये आज सकाळी झालेल्या एका सभेत कोकणवासियांनी जोरदार विरोध केला. ‘गोळ्या झेलू, पण नाणार प्रकल्प होऊ देणार नाही’ असा इशारा दिला. या सभेला नाणार भागातील जवळपास शंभरएक गावांतील नागरिक उपस्थित होते. सरकारने ऐकले तर ठीक नाही तर मंत्रालय व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देऊन आंदोलन करू अशा इशारा नागरिकांनी दिला. रत्नागिरीतील राजापूरमध्येही मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत उग्र आंदोलन करण्यात आले. कोकणातील शिवसेनेचे नेते व पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी गुरूवारीच एक निवेदन काढून हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. 

 

मुख्यमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया-

 

केंद्र सरकारने वेस्टकोस्ट रिफायनरीचा करार (MoU) केला आहे, त्यात नाणार प्रकल्पाचा उल्लेख नाही. मात्र महाराष्ट्रात सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी राज्य सरकारची इच्छा आहे, अशी सावध प्रतिक्रिया नाणार प्रकल्पाच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...