आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसा चहा पिणारे फडणवीस रात्री कुठली व किती पितात हे मला माहितयं- धनंजय मुंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचे दिल्लीतील बॉस पवारसाहेबांचे बोट धरून राजकारणात आल्याचे कबूल करतात. त्यामुळे पवारसाहेबांवर बोलण्याची तुमची लायकी नाही. तुम्ही दिवसा चहा पिता हे खरं असलं तरी रात्री कुठली आणि किती पिता हे मला माहित आहे. त्यामुळे काही पण करायचं पण राष्ट्रवादी काँग्रेसचा नाद करायचा नाही असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.

 

हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्यात धनंजय मुंडे सद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. सोलापूरातील नॉर्थकोट मैदानावर सभा झाली. त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी मुंडे यांची तोफ भाजप व फडणवीस यांच्यावर चांगलीच धडाडली. 

 

धनंजय मुंडे म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही भलेही आज मुख्यमंत्री असाल पण पवारसाहेबांच्या विरोधात बोलण्याची तुमची लायकी नाही. दिल्लीतील तुमचे गुरू पवारसाहेबांच्या बोटाला धरून राजकारण शिकलो असे म्हणतात. त्यांचे तरी ऐका. तुमचे सरकार कधीच पडले असते पण राज्याला पुन्हा निवडणूका परवडणा-या नाहीत म्हणून वाचला. त्यामुळे जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा असेही मुंडे यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

 

धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी चंद्राकांतदादा पाटील यांच्यावरही सडकून टीका केली होती. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या महामेळाव्यात अजित पवार आणि सुनील तटकरे यांना उद्देशून, भुजबळ यांच्या शेजारी आणखी दोन कोठडीच्या जागा मोकळ्या आहेत असे वक्तव्य केले होते. त्याला मुंडे यांनी लागलीच उत्तर देत, चंद्रकांतदादा, आता दोन जागा नाही तर तुमच्या 16 भ्रष्ट्राचारी मंत्र्यांसाठी कोठडीत जागा तयार ठेवा असे प्रत्त्युत्तर दिले होते.

बातम्या आणखी आहेत...