आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- देशातील सर्वात मोठा उद्योग समुह 'रिलायन्स'चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची सहचारिणी व बिझनेसवुमन नीता अंबानी यांना आपण सर्वजण ओळखतोच. पण कधी काळी नीता अंबानींना शिक्षक व्हायचे होते. लग्नाच्या आधी व नंतरही काळ नीता यांनी एक शिक्षिका म्हणून काम केले आहे. पुढे शिक्षिका म्हणून काम करणे शक्य झाले नाही पण त्यांनी धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली. या शाळेत मात्र, आपल्या बहिणीला प्राचार्य म्हणून ठेवले जेणेकरून शाळेचे एक स्टॅंडर्ड मेन्टेंन होईल. आज आम्ही आपल्याला नीता अंबानी यांची धाकटी बहीण ममता दलाल हिची ओळख करून देत आहोत.
प्रायमरी टीचर आहे ममता-
- नीता अंबानी या स्टाईल व ग्लॅमरमुळे आता चर्चेत राहत असतील. पण त्यांची धाकटी बहिण ममता दलाल हिचे राहणीमान साधारणच आहे.
- मीडियापासूनही ती लांब राहणेच पसंत करते. वांद्रे येथील धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये ममता ही प्रायमरी टीचर म्हणून रूजू झाल्या.
- स्कूलच्या कामात ममताने नीता यांना मदत केली होती. आता त्या प्रायमरी विभागाच्या प्राचार्य व मॅनेजमेंटच्या भाग आहेत.
सचिन, शाहरुखच्या मुलांना शिकवले....
- ममता हिला लहान मुलांना शिकवायला आवडते. त्यामुळे धीरूभाई अंबानी स्कूलचे व्यवस्थापन सांभाळत असताना ममताने यूकेजी क्लासमध्ये शिकवण्याचे काम केले.
- 'मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा व बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहानाशिवाय अनेक सेलिब्रिटीजच्या मुलांना त्यांनी शिकवले.
- परंतु, मुलांमध्ये कधी फरक केला. सगळे मुले एकसमान आहे', असे ममताने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते.
ईशा, अनंत सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच वागणूक-
- नीता अंबानींना आपल्या मुलांना लाडवून ठेवायचे नव्हते. त्यामुळे बहिणीला आपली मुले आकाश, ईशा व अनंत यांना या शाळेत सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच वागणूक देण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.
- आपली मुले बिघडू नयेत म्हणून या मुलांना आपली स्कूल आहे हे माहित होऊ दिले नाही. पुढे पुढे मुलांना कळायला लागल्यानंतर ही बाब समजली पण नीता अंबानींनी मुलांवर एक चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला.
- बहिण ममता यांच्याद्वारे त्या मुलांवर लक्ष ठेऊन असत. मुलांवर या संस्काराचा फायदा झाल्याचे आता दिसते.
रँप वॉकही केले-
- प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा व शाइना एनसीच्या एका चॅरिटीसाठी अॅक्ट्रेस काजोल, विद्या मालवडेसोबत ममता दलाल हिने रँप वॉक केले होती.
- टीचिंगशिवाय ममता ज्वेलरी डिझाइनचेही काम करते.
पुढील स्लाईड्सवर वाचा ममता दलालचे निवडक फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.