आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरपुडीत उभे राहणार नवीन जालना शहर; सिडकोच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -नवीन जालना शहराची मौजे खरपुडी येथे उभारणी करण्याबाबतच्या सिडकोच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तत्त्वत: मान्यता दिली. 

पाणी उपलब्धता व अन्य सुविधा व प्रकल्प विकसित झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरण याबाबत सविस्तर अभ्यास करून पुन्हा अहवाल सादर करण्याच्या सूचना या वेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस जालन्याचे जिल्हाधिकारी, खासदार रावसाहेब दानवे अादी उपस्थित हाेते.  या प्रकल्पासाठी सिडकोची नियुक्ती ही विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून करण्यात आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी पर्यावरण सल्लागाराची नियुक्ती करून अहवाल सप्टेंबर २०११ मध्ये प्रधान सचिवांना सादर केला हाेता.

५५९ हेक्टर निवासी
खरपुडी गावातील एकूण क्षेत्रापैकी ५५९.३६ हेक्टर इतके क्षेत्र निवासी भाग असेल तर उर्वरित ६५०.६५ हेक्टर क्षेत्र हरित भागात समाविष्ट आहे. या क्षेत्रावर शहर विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.

बातम्या आणखी आहेत...