आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत नवविवाहित तरूणीची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील ताडदेव परिसरातील एका नवविवाहिता तरूणीने इमारतीच्या 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. छाया भूतिया (24) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.

 

छाया भूतियाचे काही दिवसापूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे नवविवाहिता असणा-या छायाने हे पाऊल का उचलल्याने तिच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे.

 

छायाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. ताडदेव पोलिस पुढील तपास करत आहे.