आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमध्ये करमून घेतले, आता भाजपात घेईन- राणे; स्वाभिमान पक्षाबाबत आठवडाभरात निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेसमध्ये करमून घेतले, आता भाजपत घेईन, राज्यसभेत राहूनही महाराष्ट्राच्या समस्या सोडवता येतातच. मी आता भाजपाचा खासदार झालो आहे. शिवसेनेला आता काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, असे आव्हान देत नुकतीच स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाबाबत आठवडाभरात निर्णय घेणार असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे नवनियुक्त राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी सांगितले.


बिनविरोध निवड झाल्यानंतर गुरुवारी राणे बोलत होते. खासदारकीबाबत तांत्रिक मुद्दे उपस्थित करणाऱ्या सेनेवर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपने राष्ट्रीय पातळीवर संधी दिली आहे. शिवसेना आपल्या मार्गात अडथळा आणू शकत नाही. मी खासदार झाल्याचे गुरुवारी प्रमाणपत्र मिळाले आहे. आता शिवसेनेने  त्यांना काय करायचे ते ठरावावे. बहुदा उद्या सकाळी ते सरकारमध्ये नसतील, असा टोला राणे यांनी लगावला. 


भाजपच्या चिन्हावर खासदारकी स्वीकारल्यानंतर आपल्या नवीन पक्षाचे काय होणार, असे विचारता ‘याबाबतचा निर्णय आठवडाभरात घेऊ’ असे ते म्हणाले. पक्ष अॅडजस्ट करणार की तुम्ही याविषयी विचाले असता, ज्याला गरज आहे, त्याने अॅडजस्ट करावे, असे ते म्हणाले. 

 

नाणार प्रकल्पाला विरोध
कोकणातील नाणार रिफायनरिला आपला ठाम विरोध आहे. तर जैतापूर अणुूऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा आहे. नाणार केंद्राचा प्रकल्प असला तरी राज्यसभेत आपण हा प्रकल्प कोकणात नको, अशीच भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील रखडलेल्या विकास प्रकल्पाचा पाठपुरावा करण्याचा आपला प्रयत्न राहिल. किंबहुना याबाबत चर्चा करूनच आपण राजकीय निर्णय घेतल्याचे राणे म्हणाले.  राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, एवढी मोठी महसुली तूट राज्याच्या दृष्टीने चांगली नाही, ती टप्प्याटप्प्याने कमी करावी लागेल तसेच अर्थसंकल्प मोठा करावा लागेल, असे मत राणे यांनी व्यक्त केले.

 

बातम्या आणखी आहेत...