आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला पायबंद, आता उत्तर प्रदेशात गुंतवणूक करा- योगी आदित्‍यनाथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कायदा सुव्यवस्थेची वाईट स्थिती अाणि लालफीतशाहीमुळे उत्तर प्रदेशातील व्यावसायिक वातावरण माेठ्या प्रमाणावर खराब झाले हाेते. परंतु राज्यात गुंतवणूक अाकर्षित करण्यासाठी राज्य सरकार गुन्हेगारी अाणि भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी कडक पावले उचलत अाहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी अाता पाेषक वातावरण झाले असून उद्याेगपतींनी राज्यात गुंतवणूक करावी, असे अावाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी अादित्यनाथ यांनी मुंबईत शुक्रवारी अायाेजित केलेल्या गुंतवणूक परिषदेत बाेलताना केले.  


नवीन वर्षात २१ अाणि २२ फेब्रुवारी राेजी लखनऊमध्ये उत्तर प्रदेश गुंतवणूक परिषद अायाेजित करण्यात अाली अाहे. त्या दृष्टीने राज्यात गुंतवणूक अाकर्षित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री अादित्यनाथ यांनी मुंबईत राेड शाे अायाेजित केला हाेता. या परिषदेच्या बाेधचिन्हाचे अनावरणदेखील या वेळी करण्यात अाले. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी अाणि भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी झीराे टाॅलरन्सचा कडक नियम लागू करण्यात येत अाहे. त्याचबराेबर दहतशतवादाचा सामना करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात अाले अाहे. त्यामुळे राज्यात सकारात्मक बदल घडून येत असल्याचे अापण विश्वासपूर्वक सांगू शकताे. हाच विश्वास उद्याेगपती अाणि चित्रपट जगताशी जाेडल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये निर्माण हाेईल, असे सांगून याेगी यांनी  राज्यात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण असल्याचा पुन्हा एकदा निर्वाळा दिला.  


विमानतळाचीही साेय
उद्याेगपतींना कनेक्टिव्हिटी सुलभ व्हावी यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच नाॅयडाजवळील जेवार येथे अांतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी परवानगी दिली अाहे. राज्यात नवीन विमानतळांचा विकास करण्यासाठी खासगी क्षेत्राने सहभाग घ्यावा, असे अावाहनही त्यांनी या वेळी केले.  


रोजगार देण्यासाठी विविध योजना  
राज्य सरकार अाैद्याेगिक गुंंतवणूक अाणि राेजगार धाेरणावर प्रामुख्याने भर देत अाहे. खाद्य प्रक्रिया, कृषी, डेअरीसारख्या क्षेत्रांत राज्यातील युवकांना राेजगार निर्माण करून देण्यासाठी विविध याेजना अाखण्यात येत अाहेत. राज्याचे अाैद्याेगिक धाेरण व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत अनुकूल असून गुंतवणूकदारांना अाकर्षित करण्यासाठीदेखील विविध याेजना अाखण्यात येत असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.   


टाटा, अंबानींचा सहभाग  
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी, टाटा ट्रस्टचे रतन टाटा, टाटा समूहाचे चंद्रशेखरन, महिंद्रा अँड महिंद्राचे पवन गाेयंका, एस्सेल समूहाचे सुभाषचंद्र, हिंदुजा समूहाचे अशाेक हिंदुजा, एचडीएफसीचे दीपक पारेख, बजाज इलेक्ट्रिकल्सचे शेखर बजाज, अरविंद ग्रुपचे अरविंद लाल भाई, टाॅरेंट समूहाचे सुधीर मेहता, अजंता फार्माचे मधुसूदन अग्रवाल.

बातम्या आणखी आहेत...