आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाळकेच्या आत्महत्येचे शिवसेना प्रायश्चित्त घेणार का : राधाकृष्ण विखे पाटील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जीएसटी आणि नोटबंदीला कंटाळून कराड येथील तरुण व्यापारी राहुल फाळके याने नुकतीच आत्महत्या केली. त्याचे प्रायश्चित्त म्हणून केंद्र सरकारविरुद्ध लोकसभेत आलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने शिवसेना मतदान करणार काय, असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी उपस्थित करत शिवसेना सदस्यांना चिमटे काढले.  


कराड येथील ३२ वर्षीय सराफा व्यापारी राहुल राजाराम फाळके याने आत्महत्या केली. विखे यांनी सोमवारी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला.  ते म्हणाले की, केंद्राने नोटबंदी आणि जीएसटी, या दोन निर्णयांमुळे व्यापारी उद्ध्वस्त झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांना जनतेच्या वेदना समजतात. शिवसेनेचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि ठाकरेंंवर विश्वास असलेल्या तरुण व्यापाऱ्याची शोकांतिका केंद्राने झाली. याचे प्रायश्चित्त करायचे असेल तर शिवसेनेने लोकसभेत केंद्र सरकारविरुद्ध अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करावे, असे आवाहन विखे पाटील यांनी केले.   

बातम्या आणखी आहेत...