आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्भयाची आई या वयातही एवढी सुंदर आहे तर निर्भया कशी असेल?- माजी DGP ची मुक्ताफळं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरुच्या प्रसिद्ध आयपीएस डी रुपा यांचा सन्मान करताना निर्भयाची आई-वडिल तर डावीकडे एचटी सांगलियाना.... - Divya Marathi
बंगळुरुच्या प्रसिद्ध आयपीएस डी रुपा यांचा सन्मान करताना निर्भयाची आई-वडिल तर डावीकडे एचटी सांगलियाना....

बंगळुरू- निर्भयाच्या आईची शरीरयष्टी जर या वयातही इतकी चांगली असेल तर निभर्या किती सुंदर असेल? असे वक्तव्य करत कर्नाटकच्या माजी डीजीपी एचटी सांगलियाना यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. सांगलियांना एवढ्यावरच थांबले नाहीत तर तरूणींना व महिलांना सल्ला देतानाही ते काही बाही बरळले. जर तुमच्यावर पुरूषांनी जबरदस्ती केली तर तुम्ही त्याला शरण जात तो म्हणेल तसे वागा. तुम्ही आधी सुरक्षित राहा, जीव वाचवा. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे मग तुम्ही त्याला पोलिसांत, कोर्टात खेचा असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. दरम्यान, एचटी सांगलियांना यांच्या वक्तव्यानंतर महिला वर्गात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

 

मागील आठवड्यात सर्वत्र महिला दिन साजरा झाला. 9 मार्च रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरूत महिलांचा सन्मान करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला आयोजकांनी 2012 साली दिल्लीत घडलेल्या निर्भया हत्याकांडातील निर्भयाच्या आई-वडिलांना निमंत्रित करण्यात आले होते. या सन्मान सोहळ्यात सांगलियाना यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत. विशेष म्हणजे ही मुक्ताफळं त्यांनी निर्भयाच्या आई-वडिल व शेकडो महिलासमोर काढल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....