आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविश्वास प्रस्ताव: शिवसेनेचा मतदानावर बहिष्कार, \'सामना\'तून दिले होते स्पष्ट संकेत, मोदी सरकारला झटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अविश्वास प्रस्तावातील अवघे काही तास शिल्लक असताना शिवसेनेने मोदी सरकारला मोठा झटका दिला आहे. शिवसेनेने अविश्वासदर्शक ठरावावर मतदान न करण्याचे जाहीर केले आहे.  तत्पूर्वी, आजच्या सामनामधून याचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. सामनात लिहिण्यात आले आहे की, देशात सध्या बहुमताची झुंडशाही सुरू आहे. याचे समर्थन करण्याऐवजी ते जनतेसोबत जातील.

 

543 खासदार असणाऱ्या लोकसभेत सध्या 11 जागा रिक्त आहेत. म्हणजेच लोकसभेत खासदारांची सध्याची संख्या 532 आहे. या हिशेबाने बहुमतासाठी आवश्यक आकडा 267 जागांचा आहे. सध्या भाजपकडे 272 खासदारांसह सरकारच्या बाजूने एकूण 295 खासदार आहेत. हा आकडा होतो 313 खासदारांचा, परंतु शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकल्याने प्रश्न निकाली निघाला आहे.

 

दुसरीकडे, विरोधात 147 खासदार आहे, तर शिवसेनेच्या 18 खासदारांना जोडून ही संख्या 165 झाली असती. आतापर्यंत 90 खासदार अविश्वास प्रस्तावाचे समर्थन करतील वा विरोध, हे सध्या स्पष्ट झालेले नाही.

 

आतापर्यंत मानले जात होते की, शिवसेना सरकारसोबत जाईल. गुरुवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यानंतर शिवसेना मोदी सरकारच्या समर्थनाच्या बाजूने मतदान करणार असे वृत्त आले होते. परंतु आजच्या 'सामना'मध्ये पक्षाने अप्रत्यक्ष रूपाने हे स्पष्ट केले आहे की, मतदानात ते मोदी सरकारचे समर्थन करणार नाहीत. तथापि, पक्षाने आता मतदान सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

एआयएडीएमकेनेही आतापर्यंत आपला कल स्पष्ट केलेला नाही. पक्षातील 37 खासदारांचा कल कुणाच्या बाजून जाईल हे अजूनही स्पष्ट नाही.
अविश्वास प्रस्तावामुळे सरकारची परीक्षा कमी आणि विरोधकांचीच जास्त दमछाक होणार आहे. कारण संख्याबळ सरकारसोबत आहे. आता फक्त सरकारविरुद्ध विरोधी पक्ष किती मजबुतीने टिकतात हे पाहावे लागेल.

 

बातम्या आणखी आहेत...