आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधील एलसीडी स्क्रीन हटविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांकडून स्क्रीनची नासधूस करण्यात येत असल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
या सुविधापासून होणार प्रवाशी वंचित
- रेल्वेने मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्याच्या सुविधेसाठी तेजस एक्स्प्रेस सुरु केल्यानंतर पहिल्याच दिवशी या गाडीतून चादर आणि उशा देखील चोरीस गेल्या होत्या. त्यामुळे रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा फेरविचार करण्याची वेळ रेल्वेवर आली.
- एलसीडी स्क्रीन हटविल्याने आता प्रवाशांना व्हिडीओ गेम पाहणे, चित्रपट पाहणे, गाणी ऐकण्याचा आनंद घेता येणार नाही.
अनुभूती एक्सप्रेसमधुन हटविणार एलसीडी स्क्रीन
- अहमदाबाद-मुंबई शताब्दी एक्सप्रेसमध्ये असणाऱ्या अनुभूती कोचमधूनही एलसीडी स्क्रीन हटविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
- अनुभूती कोचमध्येही प्रवाशांनी एलसीडी स्क्रीनचे नुकसान केल्याचे दिसून आले होते.
देणार मोफत वाय-फाय सेवा
- एलसीडी स्क्रीन हटविण्यात आल्यावर रेल्वेकडून मोफत वाय-फाय सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर चित्रपट व गाणी पाहण्याचा आनंद घेता येईल.
- ऑटोमेटिक डोर, जीपीएस, फायर स्मोक डिटेकशन सिस्टम, सीसीटीव्ही या सुविधा रेल्वे देणार आहे.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.