आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखाना बंदचे अादेश नाहीच, 34 लाख नवे राेजगार निर्मिती; कामगार मंत्र्यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कामगार कायद्यात काेणतेही बदल करण्यात अालेले नसून २०१४ पासून कारखाने बंद करण्याचे अधिकार देण्यात अालेले नाहीत किंवा कपातही करण्यात अालेली नाही, असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. 

 

अडीच लाखांवरून सत्तावीस लाखांपर्यंत बांधकाम कामगार नाेंदित अाहेत. असंघटित कामगारांना घरे देणे, त्याचबराेबर २०१४ ते २०१८ या कालावधीत ३४ लाख कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडले असून यामुळे नवीन ३४ लाख राेजगार निर्माण झाल्याचा दावा कामगार मंत्री संभाजीराव पाटिल निलंगेकर यांनी बुधवारी विधान परिषदेत केला. ते म्हणाले, मुंबईसह ठाणे, रायगड, नागपूर अादी प्रमुख अाैद्याेगिक क्षेत्रांत कामगार कायद्यातील माेठ्या बदलामुळे उद्याेग बंद पडले अाहेत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेराेजगारी वाढली अाहे. कामगार कायद्यातील बदलाचा अाैद्याेगिक क्षेत्रावर माेठा परिणाम झाल्याने राज्यात हे भीषण वास्तव निर्माण झाले आहे. राज्य सरकारने याबाबत काेणत्या उपाययाेजना केल्या  तसेच राज्यातील वाढलेली बेकारी, त्याचबराेबर असंघटित कामगारांबद्दल शासनाने केलेल्या उपाययाेजनांची माहिती द्यावी, अशी मागणी पावसकर यांनी केली होती.   


यावर उत्तर देताना कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, कामगार कायद्यात कोणत्याही प्रकारचे बदल केले नसून नवीन उद्याेग राज्यात यावेत यासाठी शासनाने अनेक उपाययाेजना केल्या आहेत, त्याचबराेबर अाजपर्यंत काेणतीही कामगार कपात झालेली नाही. कामगार नाेंदीसाठी अाराखडा तयार करण्यात अाला अाहे. कामगार नाेंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात अाली असून जाे पैसा शासनाकडे पडून अाहे ताे कामगारांच्या कल्याणासाठीच वापरला जाईल.  

 

कामगार महिलांसाठी नाक्यावर स्वच्छतागृह  
नाक्यावर महिला कामगारांना अापल्या लहान मुलांसह उभे राहावे लागते. त्यांना हाल साेसावे लागतात याकडे भाजपचे प्रवीण दरेकर यांनी लक्ष वेधले असता मंत्री पाटील म्हणाले,  नाक्यावर काम करणारा कामगार महत्त्वाचाच अाहे. त्यातील महिलांसाठी या ठिकाणी शेड उभी करून पाणी व स्वच्छतागृहाची साेय केली जाईल. कारखाने, हाॅटेलात अागी लागण्याचे प्रकार घडले अाहेत त्याची गंभीर दखल घेतली असून सुरक्षिततेच्या बाबतीत सरकार नवीन धाेरण अाणत आहे. 

बातम्या आणखी आहेत...