आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर आरक्षण शक्य नाही, विनोद तावडे यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिक्षणामध्ये मुस्लिमांना ५ % अारक्षण देण्याविषयीचा हायकाेर्टाचा अादेश हा अंतरिम अाहे. ताे अंतिम अादेश नसल्यामुळे लागू केलेला नाही. तसेच संविधानात धर्माच्या अाधारावर अारक्षण देऊ नये, असेही कोर्टाने सांगितले अाहे. त्यामुळे अल्पसंख्याकांना धर्माच्या अाधारावर अारक्षण देता येणार नाही, असे स्पष्टीकरण अल्पसंख्याकमंत्री विनाेद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले.


तावडे म्हणाले, इतर मागासवर्गीय समाजाला मिळणाऱ्या आरक्षणात मुस्लिमांनाही आरक्षण लागू होते. मुस्लिम समाजाकडून जात लिहिताना केवळ ‘मुस्लिम’ असे लिहिले जाते. त्या ठिकाणी जातीचा उल्लेख न केल्यामुळे मुस्लिमांना इतर मागासवर्गीयांना मिळणारे आरक्षण मिळत नाही.  अल्पसंख्याक समाज इतर समाजाच्या जाेडीने पुढे यावा, असे सरकारला वाटते. वक्फ बाेर्डातील अंतर्गत वाद त्यांनी प्रथम मिटवावेत. सरकार वक्फ बाेर्डासंबंधीतील प्रश्न साेडवण्यास सकारात्मक अाहे.

बातम्या आणखी आहेत...