आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज राजे मल्हारराव होळकरांची जयंती: वाचा त्यांच्या आताच्या श्रीमंत वंशजाबाबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजे यशवंत आणि नायरिका गोदरेज.... - Divya Marathi
राजे यशवंत आणि नायरिका गोदरेज....

मुंबई - इंदूर घराण्याचे संस्‍थापक व राजे मल्‍हारराव होळकर यांची आज जयंती आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे, होळकर घराण्‍याविषयी खास माहिती....

 

शिवाजीराव ऊर्फ रिचर्ड आताचे वंशज

 

रिचर्ड ऊर्फ शिवाजीराव होळकर हे होळकर घराण्‍याचे आताचे वंशज आहेत. त्‍यांची आई आणि पत्‍नी दोघीही अमेरिकन आहेत. त्‍याचे आजोबा श्रीमंत यशवंतराव (दुसरे) हे चंगळवादी स्‍वभावाचे होते. तर, मुलगा यशवंतराव आहेत ज्याचे लग्न गोदरेज कुटुंबियांतील तरूणीशी झाले आहे.

 

शेवटचे आणि सर्वात स्टाइलिश राजा होते यशवंतराव-

 

- यशवंतराव (दुसरे, त्यांचा जन्म इंदूरमध्ये 1908 साली झाला) हे होळकर राजघरण्‍याचे सर्वात अंतिम आणि सर्वात स्‍लाइलिश राजा होते.
- 17 व्‍या वर्षीच 1926 साली त्‍यांचा इंदूर घराण्याचे राजे म्हणून राज्‍याभिषेक झाला.
- यशवंतराव (दुसरे) यांना चंगळवादी आयुष्‍य जगायला आवडत होते.
- संयोगिताराजे या त्‍यांच्‍या पहिल्‍या पत्‍नी होत्‍या. त्‍यांच्‍याकडून त्‍यांना एक मुलगी झाली. त्‍याचे नाव उषाराजे.
- यशवंतराव (दुसरे) यांनी इंग्लंडच्या मार्गारेट ल्हारेर यांच्याशी दुसरा विवाह केला. पुढे त्यांना घटस्फोट देऊन अमेरिकेतील लॉस एंजल्स येथील एपोमिया वॅट यांच्याशी विवाह केला.
- एपोमिया वॅट यांच्यापासून त्यांना श्रीमंत शिवाजीराव होळकर (ज्यांना प्रिन्स रिचर्ड होळकर) नावाने ओळखले जाते.
- श्रीमंत शिवाजीराव ऊर्फ प्रिन्स रिचर्ड होळकर यांना एक मुलगा आहे ज्याचे नाव यशवंतराव ठेवले आहे.
- इंदूर घराण्याचे ते 1926 ते 1948 (देश स्वातंत्र होईपर्यंत) पर्यंत राजे राहिले. यानंतर त्यांचे इंदूर संस्थान मध्य भारतात म्हणजे आता मध्य प्रदेशात विलीन करण्यात आले.
- सलग 217 वर्षे इंदुरमध्‍ये होळकर घराण्‍याची सत्‍ता होती. मात्र, देश स्वातंत्र झाला व हे संस्थान देशात विलीन करण्यात आले.
- यानंतर यशवंतराव यांनी संयुक्त राष्ट्रात काही वर्षे काम केले. वयाच्या 53 व्या वर्षी 1961 साली त्यांचा मुंबईत मृत्यू झाला.

 

रिचर्ड अमेरिकन नागरिक-

 

- यशवंतराव (दुसरे) यांना अमेरिकन पत्नीपासून एक मुलगा आहे. जे आता इंदूरमध्ये घराण्याचे प्रमुख आहेत.
- यशवंतराव (दुसरे) यांचा अमेरिकन पत्नीपासून असलेला मुलगा शिवाजीराव ऊर्फ रिचर्ड हे अमेरिकन नागरिक आहेत.
- 12 मार्च 2018 रोजी खास रिचर्ड यांच्या सांगण्यावरून 2016 मधील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन इंदूर, महेश्वरी येथे पोहचल्या होत्या.
- रिचर्ड होळकर कुटुंबियांकडे हिलरी यांनी दोन दिवस पाहुणचार घेतला.
- रिचर्ड यांना एक पुत्र आहे ज्याचे नाव राजे यशवंतराव ठेवण्यात आले आहे.

 

मुलगा यशवंतरावचे 2015 मध्ये झाले लग्‍न-

 

- मध्‍य प्रदेशातील होळकर राजघराण्‍याचे राजकुमार यशवंत यांचे लग्न प्रसिद्ध उद्योगपती विजय कृष्‍ण गोदरेज यांची मुलगी नायरिका हिच्यासोबत 29 डिसेंबर 2015 रोजी झाले. 

 

पुढील स्‍लाईड्सवर वाचा, नायरिकापेक्षाही श्रीमंत आहे होळकर कुटुंबिय....

बातम्या आणखी आहेत...