आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोग करतोय काय? पालघरमध्ये EVM मशिनची खासगी वाहनातून वाहतूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर- पालघर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशिन खासगी वाहनातून रवाना केल्याचे समोर आले आहे. काही दक्ष नागरिकांच्या हा प्रकार लक्षात त्यांनी ही कार पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे निवडणूक आयोग करतेय काय असा सवाल उपस्थित केला जात असून, ईव्हीएम मशिनची छेडछाड व काही     गडबड घोटाळा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

 

पालघरमध्ये सोमवारी पोटनिवडणूक झाली. मतदान संपल्यानंतर सायंकाळी उशिरा चिंचरे येथील बुथ क्रमांक 17 मधील काही कर्मचा-यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या बसमधून न जाता एका खासगी कारमधून ईव्हीएम मशिन घेऊन जाऊ लागल्या. मात्र, दक्ष नागरिकांच्या ही बाब लक्षात त्यांनी ही कार किराट गावाजवळ अडवली व पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकारामुले ईव्हीएम घोटाळ्याचा संशय बळावला आहे. 

 

या प्रकारानंतर पोलिसांनी निवडणूक आयोगाला माहिती दिली. तसेच संशयित कर्मचा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. जिल्हाधिकारी प्रशांत नवनवरे यांनी घडल्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...