आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका रात्रीत 82 हजार मते कशी वाढली? पालघर निवडणुकीत घोटाळा झाल्याचा शिवसेनेचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर लोकसभा पोटनिवडणूक सोमवारी पार पडली. मात्र, मतदानाच्या दिवशी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनमध्ये गडबळ व घोळ झाल्याचे समोर आले होते. आता तर पालघर पोटनिवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतून घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. 

 

सोमवारी रात्री उशिरा 46.50 टक्के इतके मतदान झाल्याचे जाहीर केल्यानंतर मंगळवारी सकाळी ती 53.22 टक्के इतके मतदान कसे वाढले? एका रात्रीत असा काय ‘खेळ’ झाला? मतदानाचा टक्का एकदम 6.72 टक्क्यांनी कसा वाढला? तब्बल 82 हजार 737 इतकी मते रातोरात कशी काय वाढली, असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. 

 

पालघर पोटनिवडणुकीत मतदान झाल्यानंतर सर्व सहा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र व बुथवरील माहिती घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सोमवारी रात्री 46.50 टक्के इतके मतदान झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, मंगळवारी सकाळी नारनवरे यांनी अंतिम आकडेवारी जाहीर केली त्यावेळी या निवडणुकीत 53.22 इतके मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले.

 

ही मतदान वाढीची टक्केवारी 6.72 टक्के म्हणजेच एकून 82 हजार 737 इतकी मते वाढली. याबाबत शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. एका रात्रीत असा काय ‘खेळ’ झाला? मतदानाचा टक्का एकदम 6.72 टक्क्यांनी कसा वाढला? तब्बल 82 हजार 737 इतकी मते रातोरात कशी काय वाढली, असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...