आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Former Maharashtra Forest Minister Patangrao Kadam Admitted To ICU In Lilavati Hospital; He Is On Ventilator And Has Renal Dysfunction

पतंगराव कदम यांच्यावर लिलावतीत अतिदक्षता विभागात उपचार, नेत्यांकडून विचारपूस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे.  मुंबईतील लीलावती रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. कदम यांचे मूत्रपिंड काम करत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 

 

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचे सांगण्यात येते. सोशल मीडियावर कदम यांची प्रकृती बिघडल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. या सर्व प्रकारामुळे पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांसह हितचिंतकांमध्ये देखील अस्वस्थता पसरलेली आहे.  कदम यांची आज भाजप नेते चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवार, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भेट घेतली.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...