आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी प्रकरणी जेटलींचे मंत्रिपद जाणार: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांचे भाकीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर नाराज आहेत. पंतप्रधान कदाचित अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णयसुद्धा  घेऊ शकतात,’ असे भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केले. मंगळवारी विधिमंडळात काँग्रेस विधिमंडळ सदस्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर चव्हाण यांनी पीएनबी, जेटली आणि पंतप्रधान यांच्यातील नाराजीबाबत टिप्पणी केली.   


‘मोदी सरकारवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा जेटलींनी बाजू लावून धरली. मात्र पंजाब नॅशनल बँक घाेटाळ्याप्रकरणी जेटली काहीही बोललेले नाहीत. याप्रकरणी जेटली यांनी स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्या राजीनाम्याची काँग्रेस मागणी करेल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.   एकीकडे नीरव मोदीप्रकरणी विरोधक मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत तरीसुद्धा मोदींनी या प्रकरणात अद्याप मौनच बाळगलेले आहे, तर दुसरीकडे मोदी हे अर्थमंत्री जेटली यांच्यावर नाराज असल्याच्या चव्हाण यांच्या दाव्याने वेगवेगळ्या चर्चांना उत अाला हाेता.

बातम्या आणखी आहेत...