आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्याचा पोलिस कॉन्स्टेबल निघाला 7 बायकांचा दादला; दोन पत्नींचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- ठाणे जिल्ह्यातील एका पोलिसाने २८ वर्षांत एक-दोन नव्हे, तर ७ बायकांशी लग्न केल्याचे उघडकीस आले आहे. परिचारिका असलेल्या त्याच्या पत्नीनेच पतीचे पितळ उघडकीस आणले. विभागांतर्गत चौकशीत गुन्हा निष्पन्न होताच कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई केली आहे. 


ठाणे जिल्ह्यातील कल्याण विभागाच्या मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये हा पोलिस कॉन्स्टेबल कार्यरत होता. अद्यापही चौकशी सुरू असल्यामुळे त्याचे नाव जाहीर करता येणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  अंबरनाथ येथे परिचारिका असलेल्या एका महिलेने कॉन्स्टेबलची पत्नी असल्याचा दावा करत तक्रार दाखल केली आहे. तिच्याशी त्याने १९९२ मध्ये लग्न केले होते. अनेकींशी लग्न केल्याचा तिचा दावा आहे. तिच्या तक्रारीवरून विभागअंतर्गत चौकशी करण्यात आली. त्यानुसार कॉन्स्टेबलने १९८६ मध्ये पहिले लग्न केल्याचे आढळून आले. तर त्यानंतर १९९२, १९९३, १९९५, १९९८, २००७ आणि २०१४ मध्ये पुढील सहा विवाह केले.  


दोन पत्नींचा मृत्यू  
पोलिस कॉन्स्टेबलने केलेल्या एकूण सात पत्नींपैकी दोघींचा मृत्यू झाल्याचे पोलिस चौकशीत उघडकीस आले आहे. यापैकी सर्वच महिला ठाणे परिसरातीलच आहेत. दरम्यान, त्याने इतक्या जणींशी लग्न करण्याचे कारण गुलदस्त्यातच आहे. शिवाय, तो सातही विवाहांचा संसार सातही पत्नींना एकमेकींना न कळू देता नेमका कसा चालवायचा, याची चौकशी पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...