आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास नांगरे पाटलांचे पोलिसांना Fitness Challenge, पूर्ण केल्यास हवी तिथे बदली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्ट्र स्टेट पोलिस डिपार्टमेंटने पोलिसांना फिट ठेवण्यासाठी एक खास शक्कल शोधली आहे. एका रिपोर्टनुसार जानेवारी 2019 पर्यंत वजन कमी करणाऱ्यांना पोलिस विभागाने त्यांना हवी त्याठिकाणी बदली देण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची ही कल्पना होती. त्यानुसार 26 जानेवारी 2019 ला एक मॅराथॉन घेतली जाणार आहे. त्यात तीन वयोगटातील टॉप-25 पोलिस कर्मचाऱ्यांना हवी त्याठिकाणी पोस्टींग दिली जाईल. 


वयानुसार असेल टार्गेट 
- सुत्रांच्या माहितीनुसार नांगरे पाटील यांनी 13,000 पोलिस कर्मचाऱ्यांना हे आव्हान दिले आहे. यात सोलापूर, पुणे, सतारा, सांगली आणि कोल्हापूरच्या पोलिसांचा समावेश आहे. 
- मॅराथॉन तीन वयोगटात होईळ. त्यानुसार 40 वर्षांपेक्षा कमी पोलिसांसाठी 21 किमी, 40 ते 50 वयोगटासाठी 10 किमी आणि 50 पेक्षा अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांसाठी 5 किमी धावण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. 


ट्रेनिंग आणि चेकअप 
- वजन वाढलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) रेकॉर्ड केले आहेत. त्यांनी वजन कमी केले तर त्यांच्यापैकी टॉप-25 कर्मचाऱ्यांना हवी त्याठिकाणी पोस्टींग मिळेल. 
- त्यासाठी मॅराथॉन ट्रेनिंग आणि मेडिकल चेकअपही करण्यात आले. त्यात 100 पेक्षा अदिक पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मैराथॉनच्या ट्रेनिंगसाठी त्यांना भारतातील पहिले आइर्नमॅन ट्राइअॅथलिट डॉक्टर कौस्तुभ राडकर यांच्याकडे पाठवण्यात आले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...