आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काका बाळासाहेबांकडून घेतले राजकारणाचे बाळकडू; असा आहे राज ठाकरेंचा जीवनपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. 14 जून 1968 रोजी मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण मुंबईतील बालमोहन विद्यामंदिर मधून घेतले. तर उच्च शिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून घेतले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने divyamarathi.com आपल्‍या वाचकांना सांगत आहे त्‍यांच्‍याविषयी रंजक माहिती...


राज ठाकरे (पुर्ण नाव: स्वराज श्रीकांत ठाकरे) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण प्रामुख्याने महाराष्ट्र व मराठीभाषा यांच्याभोवतीच केंद्रित ठेवले आहे. मुंबई व परिसरात नव्याने वास्तव्यास येत असलेल्या बिहारी व उत्तर प्रदेशी लोकांच्या लोंढ्याला राज ठाकरे यांनी 2008 मध्ये टीकेचे लक्ष्य बनवले. आपल्या अनेक आंदोलनतून त्यांनी थेट परप्रांतिय लोकांविरोधात सुर आवळला. यातूनच राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले.


राज कसे आले राजकारणात ?
राज ठाकरे यांना लहानपणापासूनच बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवत माणतात. राज यांची राजकीय कारकिर्द शिवसेनेतच सुरू झाली. उमदे व प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरे यांनी स्वतःच्या बळावर समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळवला. विद्यार्थी सेनेच्‍या माध्‍यमातून शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळवून देण्यात राज यांचा वाटा महत्त्वाचा समजला जातो. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे राज ठाकरे यांच्याकडेच जाणार अशी चर्चा होती. परंतु, शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली. यामुळे राज यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. राज ठाकरे यांना डावलल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. मार्च 2006 मध्ये शिवसेनेत आपल्याला दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली.


...तर वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट बनवले असते
राज ठाकरे आपले काकांप्रमाणे व्यंग्यचित्रकार आहेत. वॉल्ट डिस्नी हे राज यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसतो तर नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट करणे आवडले असते, असे त्याचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.


पुढील स्‍लाइड्वर वाचा राज ठाकरेंविषयी रंजक माहिती...

बातम्या आणखी आहेत...