आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर-शिक्षकच्या ४ जागांसाठी आज मतदान, ५२ उमेदवार रिंगणात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या ४ जागांसाठी सोमवारी मतदान होत अाहे. या ४ मतदारसंघात २ लाख ३९ हजार मतदार असून एकुण ५२ उमेदवार रिंगणात आहेत. २८ जूनला मतमोजणी होणार आहे. 


मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघांतून विधान परिषदेसाठी हे मतदान आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघात ७०,६३६ मतदार आहेत. येथे १२ उमेदवार रिंगणात असून प्रमुख लढत भाजपचे अमित महेता व शिवसेनेचे विलास पोतनीस यांच्यात आहे. लोकभारतीचे जालींदर सरोदे व बहुजन मुक्ती पार्टीचे रूपाली भडकेही मैदानात आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचे शिवाजी शेंडगे, भाजप पुरस्कृत अनिल देशमुख व लोकभारतीचे कपिल पाटील यांच्यात लढत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे, शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे व राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांच्यात लढत आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...