आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता; सोयाबीन, कापसाला फटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - यंदा सरासरीपेक्षा कमी मान्सून बरसू शकतो. याला कारणीभूत अल नीनोचा प्रभाव जूननंतर दिसू शकतो. भाैगोलिक सांख्यिकी क्षेत्रात काम करणारी अमेरिकेची खासगी संस्था रेडिएंट सोलुशन्सने हा अंदाज वर्तवला अाहे.

 

संस्थेचे वरिष्ठ हवामान तज्ज्ञ काइल टॅपले म्हणाले, कमी पावसामुळे भारतात सोयाबीन, भुईमूग आणि कापसाच्या पिकांना फटका बसू शकतो. गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. दीर्घ अवधीच्या सरासरीच्या तुलनेत ९५% पाऊस पडला होता. हवामान खात्याने ९८% पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.


काइल म्हणाले, ला-नीना कमकुवत होत आहे आणि अल नीनोची शक्यता वाढत आहे. हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या इतर खासगी कंपन्यांनीही अल नीनोची शक्यता व्यक्त केली आहे. तथापि, सरकारी विभागांनी याबाबत अंदाज व्यक्त केलेला नाही. अल नीनोमुळे आशियातील काही भागांत दुष्काळसदृश स्थिती होते, तर दक्षिण अमेरिकेत नेहमीपेक्षा
जास्त पाऊस पडतो.

बातम्या आणखी आहेत...